औरंगाबाद, 4 ऑगस्ट : औरंगाबाद जिल्ह्यात एका एसटी बस चालकाच्या विचित्ररित्या बस चालवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बस चालक विचित्र, धोकादायकरित्या बस चालवत असल्याने एका दुचाकीला अपघात झाला आहे. या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये एक एसटी विचित्र पद्धतीने रस्त्यावर धावताना दिसत आहे. चालक बस अशी विचित्ररित्या चालवत असल्यानेमुळे रस्त्यावर धोका निर्माण झाला. विचित्र पद्धतीने धावणाऱ्या बसने आधी एका दुचाकी स्वाराला कट मारली. त्यात अपघात होता होता तो बचावला. त्या दुचाकी चालकाला अशी धोकादायक कट मारल्याने त्याने लगेच या बसचा पाठलाग सुरू केला आणि त्याने विचित्र चालणाऱ्या बसचा सर्व प्रकार मोबाईलमध्ये शूट केला.
या बसमध्ये प्रवासी होते की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. व्हिडीओमध्ये बस रस्त्यावर पूर्णपणे तिरक्या दिशेने जाताना दिसते आहे. अनेक दुचाकी चालकांच्या अतिशय जवळून बस जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.
दुचाकी चालक मागून शूट करत असतानाच दुर्दैवाने या बसने पुन्हा पुढे जावून एका दुचाकी चालकाला मागच्या बाजूने धक्का मारला. यात दुचाकी चालक पूर्णपणे खाली पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.
औरंगाबाद जिल्ह्यात एक ST चालक विचित्र, धोकादायक पद्धतीने बस चालवत आहे. या बसमुळे एका दुचाकीला अपघात झाला असून चालक जखमी झाला आहे. #Aurangabad #ST #Accident pic.twitter.com/jzsKOUEieH
— News18Lokmat (@News18lokmat) August 4, 2021
आपल्या बसमुळे दुचाकीला अपघात झाला तरीही बस थांबत नाही. बस चालक न थांबताच पुढे निघून जातो. बसच्या धडकेत दुचाकी चालक जखमी झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.