आईने आपल्या मुलीच्या मॅझिक ट्रिकची चांगलीच बँड वाचवली आहे. ज्या व्हिडीओत ती जादू दाखवत होती तिथंच ऑन द स्पॉट आईने तिचा भांडाफोड केला आहे. हे वाचा - 'ए मम्मी आ गई क्या...' म्हणता म्हणता खरंच आली आई आणि...; असा झाला चिमुकलीच्या VIDEO चा शेवट व्हिडीओत पाहू शकता महिला जादू दाखवण्याचा प्रयत्न करते. ती एका काचेच्या ग्लासमध्ये मेणबत्ती लावून ती पेटवते आणि त्यात पाणी भरते. पाण्याने ती ग्लास पूर्ण भरते ज्यामुळे मेणबत्ती पाण्यात पूर्ण बुडते. पण आश्चर्य म्हणजे पाण्यात मेणबत्ती बुडाली तरी ती विझत नाही. पाहताच आल्यालाही आश्चर्य वाटतं. महिलेची जादू पाहून आपण थक्कच होतो, असं कसं शक्य आहे, तेच समजत नाही. शेवटी या महिलेची वयस्कर आई येते आणि ती असं काही करते ज्यामुळे आपल्याला हे कसं काय शक्य आहे, याचं उत्तर मिळतं आणि या महिलेची म्हणजे तिच्या लेकीची चांगलीच फजिती होते. महिलेची आई तो ग्लास उचलते आणि त्यामागील सत्य समोर येतं. महिलेने जी मेणबत्ती लावली आहे ती ग्लासच्या बाहेरून ग्लासला चिटकवलेली आहे. हे वाचा - बापरे! हे काय आहे? बाळाचा VIDEO पाहून आईला फुटला घाम आईने असं करताच महिलेच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. पण व्हिडीओ पाहून आपल्याला मात्र हसू आवरत नाही. hepgul5 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर मजेशीर कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Daughter, Funny video, Mother, Parents and child, Viral, Viral videos