• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • जबड्यातील कुत्र्याला सोडून मगरीने ठोकली धूम; नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

जबड्यातील कुत्र्याला सोडून मगरीने ठोकली धूम; नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

मगर आणि कुत्र्याचा हा थरारक व्हिडीओ (Crocodile and dog video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

 • Share this:
  मुंबई, 02 ऑगस्ट : मगरीच्या (Crocodile) जबड्यात एकदा कुणी सापडलं तर त्याची सुटका शक्यच नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका मगरीच्या जबड्यातून छोटाशा कुत्रा (Dog) मात्र अगदी सहजपणे सुटला. खरंतर कुत्र्यावर हल्ला करताच मगरीनेच (Crocodile attack on dog) तिथून पळ काढला. या मगर आणि कुत्र्याच्या शिकारीचा हा थरारक व्हिडीओ (Crocodile and dog video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. कधी कधी प्राण्यांमधील शिकारीचे असे व्हिडीओ पाहायला मिळतात ज्यात कोण सावज आणि कोण शिकारी तेच समजत नाही. असाच हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता पाण्याच्या किनाऱ्याजवळ एक कुत्रा उभा आहे. तो पाण्याकडे निरखून पाहतो आहे. त्याला पाण्यात हालचाल दिसून येते. पाण्यातून आपल्या दिशेनं काही तरी येत असल्याचं दिसतं. तो तिकडे टक लावून पाहत असतो आणि सावध होतो. एखादा मासाच असावा असं त्याला वाटतं आणि तो शिकारीच्याच तयारीत असतं. इतक्यात पाण्यातून त्याच्या दिशेने येणारा प्राणी डोकं वर काढतो हा प्राणी म्हणजे मासा नव्हे तर चक्क मगर असते. हे वाचा - ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! 18 सेकंदात फस्त केला तब्बल 2 लीटर सोडा; पाहा VIDEO मगर कुत्र्याला आपल्या जबड्यात घेण्यासाठी पाण्यातून डोकं वर काढतं पण ती आपला जबडा उघडणार त्याआधीच शिकारीच्या तयारीत असलेला कुत्रा मगरीचा जबडा आपल्या तोंडात घेतो. मगर कुत्र्याच्या तोंडातून सुटण्यासाठी धडपडू लागते. ती कुत्र्याला पाण्यात खेचते. पाण्यात जाताच कुत्रा मगरीला आपल्या जबड्यातून सोडतो.  हे पाहताच आजूबाजूचे लोकही तिथं धावत येतात. मगर पाण्यात गायब होते आणि कुत्रा सुद्धा पोहोत पोहोत दुसऱ्या किनाऱ्यावर येताना दिसतो. हे वाचा - VIDEO: बापरे! मगरीसोबत ऐटीत फिरताना दिसली महिला; धाडस पाहून चक्रावून जा द डार्क साइड ऑफ नेचर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: