जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! 18 सेकंदात फस्त केला तब्बल 2 लीटर सोडा; पाहा VIDEO

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! 18 सेकंदात फस्त केला तब्बल 2 लीटर सोडा; पाहा VIDEO

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! 18 सेकंदात फस्त केला तब्बल 2 लीटर सोडा; पाहा VIDEO

जितक्या वेळेत आपल्याला साधं पाणीही पिणं शक्य होणार नाही, तितक्या कमी वेळेत आणि वेगात ही व्यक्ती सोडा प्यायली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 ऑगस्ट : आपल्यापैकी बरेच जण खाण्यापिण्याचे शौकिन आहेत. कोण किती जास्त खातं किंवा कमी वेळात कोण जास्त खातं, अशी शर्यत तशी आपल्यासाठी काही नवी नाही. पण या व्यक्तीला अद्याप तरी जगातील कोणतीच व्यक्ती तोड देऊ शकत नाही. या व्यक्तीने कमीत कमी वेळेतर पिण्याचा (Drinking soda) वर्ल्ड रेकॉर्डच (Weird world Record) केला आहे. बरं तो पाणी नाही बरं का सोडा प्यायला आहे. फक्त 18 सेकंदाच त्याने तब्बल 2 लीटर सोडा फस्त केला आहे (Drinking soda world record). जितक्या वेळेत आपल्याला साधं पाणीही पिणं शक्य होणार नाही, तितक्या कमी वेळेत आणि वेगात ही व्यक्ती सोडा प्यायली आहे.  या व्यक्तीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने (Guinness Book Of Record) नोंद घेतली आहे.

जाहिरात

सामान्यपणे एक ग्लासभर कोल्ड ड्रिंकसुद्धा आपल्याला एकाच घोटात जात नाही. आपण तो हळूहळू थांबत थांबतच पितो. पण एरिक बॅडलँड्स बुकरमे मात्र आपलं विचित्र कौशल्य दाखवून हैराणच केलं आहे. तो ज्या वेगाने सोडा पितो ते पाहूनच तुम्ही हैराण व्हाल. हे वाचा -  ‘बसपन का प्यार…‘वाल्या चिमुकल्याचं आणखी एक लव्ह साँग; हा VIDEO पाहिला का? गिनीज बुकच्या ऑफिशिअल अकाऊंटवरच हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या 18.45 सेकंदात त्याने 2 लीटर सोडा फस्त केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. (Viral Video). व्हिडीओत पाहू शकता तो 2 लीटर सोडा एका घोटात पितो. तोंडातून जार न काढता घटाघट सोडा पित जातो. त्याचा हा विचित्र रेकॉर्ड कुणीच मोडू शकला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात