जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video: समोरासमोर येताच आपसात भिडले मगर आणि विशालकाय अजगर; शेवटी कोण जिंकलं?

Viral Video: समोरासमोर येताच आपसात भिडले मगर आणि विशालकाय अजगर; शेवटी कोण जिंकलं?

मगर आणि अजगराची लढाई

मगर आणि अजगराची लढाई

मगर आणि अजगर हे दोन जीव समोरासमोर येतील आणि भिडतील तेव्हा कोण जिंकेल? हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 21 जुलै : मगर हा अतिशय धोकादायक प्राणी आहे, पण त्यांच्यासारखे इतरही अनेक प्राणी आहेत, जे समोर येताच कोणाचाही थरकाप उडतो. आपल्या शत्रूला धूळ चाटण्यातही ते यशस्वी होतात. अजगर हा देखील असाच एक प्राणी आहे. अजगर स्वतःहून अधिक शक्तिशाली प्राण्यालाही मारू शकतो. अशात मगर आणि अजगर हे दोन जीव समोरासमोर येतील आणि भिडतील तेव्हा कोण जिंकेल? हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात मगर आणि अजगराची लढाई पाहायला मिळत आहे. @earth.reel नावाच्या Instagram अकाऊंटवर अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मगर आणि अजगर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. मगरीचे दात खूप मजबूत असतात, एकदा एखाद्या प्राण्याला तिने जबड्यात पकडलं की त्याचा जीव घेतल्याशिवाय सोडत नाही. त्याचप्रमाणे आपल्या शरीराने एखाद्याला विळखा घालतात आणि शेवटपर्यंत सोडत नाहीत. मात्र याच दोघांमध्ये लढाई झाली तेव्हा अजगराची शक्ती कमी पडली आणि मगरीने एकतर्फी हल्ला करून त्याला अद्दल घडवली.

जाहिरात

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका पार्कसारख्या ठिकाणी मगर आणि अजगर दिसत आहेत. मगरीने अजगराला तोंडात पकडल्याचं पाहायला मिळतं. यानंतर अजगराने त्या मगरीला पकडण्याचा प्रयत्न करताच मगर त्याला जबड्यात पकडून जमिनीवर आदळू लागते. अजगराच्या शरीरात मगरीचे दात जडलेले आहेत आणि ती अजगराला एखाद्या खेळण्याप्रमाणे हलवताना दिसते. अजगर तिच्यासमोर काहीही करू शकला नाही. VIDEO - वाशिष्टी-शिव नदीच्या पुरानंतर चिपळूणमध्ये नवं संकट; नागरिकांनो कृपया करू नका असं धाडस या व्हिडिओला 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं, की हे मगरीसाठी दोन मिनिटांच्या नूडलसारखं आहे. दुसऱ्याने म्हटलं, की त्याला मगरी आवडतात पण साप आवडत नाहीत. एकजण म्हणाला की हा सीन कोणाच्या अंगणात चालू आहे का? आणखी एकाने सांगितलं, की मगरीला कोणीही पकडू शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात