जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - वाशिष्टी-शिव नदीच्या पुरानंतर चिपळूणमध्ये नवं संकट; नागरिकांनो कृपया करू नका असं धाडस

VIDEO - वाशिष्टी-शिव नदीच्या पुरानंतर चिपळूणमध्ये नवं संकट; नागरिकांनो कृपया करू नका असं धाडस

पुरानंतर नवा धोका.

पुरानंतर नवा धोका.

पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मृत्यूच शहरात घुसला आहे.

  • -MIN READ Chiplun,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

रत्नागिरी, 20 जुलै :  धो-धो पाऊस , त्यानंतर नद्यांना पूर आणि आता नवं संकट… चिपळूणमध्ये वाशिष्टी आणि शिव नदीला पूर आल्यानंतर सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. यातून कुठे लोक स्वतःला सांभाळत आहेत, त्यानंतर नवं संकट समोर आलं आहे. पुरामुळे शहरातील विविध भागात मगरी आल्या आहेत. त्यामुळे नवा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे वाशिष्टी नदीला आलेल्या पुराचा परिणाम मगरींवर झाला. पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मगरीही शहरात वाहून आल्या. अशीच एक मगर चिपळूण शहराच्या जुना बाजार पुलावर होती. एका व्यक्तीने मगरीला पाहिलं आणि तिला दोरीने बांधलं. हा धक्कादायक असा व्हिडीओ समोर आला आहे. Thane Rain : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्याही ठाणे जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पुलावर एका मगरीला दोरीच्या सहाय्याने बांधण्यात आलं आहे. एका व्यक्तीने मगरीला बांधलेली ही दोरी आपल्या हातात ठेवली आहे. मगर सुटकेसाठी धडपडते आहेच. पण त्या व्यक्तीवरही हल्ला करताना दिसते आहे.

जाहिरात

शहरात अशा कुठल्याही प्रकारचा वन्यजीव आढळल्यास त्याला जेरबंद करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना कळवलं जाते. असे असताना काही लोक स्वतःचा जीव धोक्यात टाकून अमानुष पद्धतीने मगरीला दोरीच्या सहाय्याने दिसत आहेत. हे त्यांच्या जीवासाठीही धोकादायक आहे. कोल्हापूरकरांनो, काळजी घ्या, पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर, 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी त्यामुळे तुमच्यासमोर अशी मगर आली तर तुम्ही असं धाडस बिलकुल करू नका, इतकंच आवाहन.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात