नवी दिल्ली 13 जुलै : सिंहाची शिकार कोणी हिसकावून घेऊ शकतं, असं तुम्हाला वाटतं का? याचा विचार करणंही सोपं नाही. पण यूट्यूबवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मगर शिकार चोरण्यासाठी चक्क सिंहाच्या गुहेत पोहोचल्याचं दिसतं. ती आपल्या या कामात यशस्वी होणारच होती. मात्र इतक्यात शिकारी तिथे आले. मग पुढे जे घडलं त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. लेटेस्ट Sightings नावाच्या अकाऊंटवरुन ही क्लिप YouTube वर शेअर करण्यात आली आहे. हा व्हिडिओ क्रुगर नॅशनल पार्कचा आहे. रोजा स्वार्ट नावाच्या पर्यटकाने जंगल सफारीदरम्यानचा हा अप्रतिम क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. जो सध्या व्हायरल होत आहे. दोन सिंहीणी आणि त्यांच्या पिल्लांनी मिळून एक म्हैस मारली असल्याचं यात सांगितलं गेलं आहे. पण इतक्यात एक मोठी मगर तिथे पोहोचली, तेव्हा सिंहीणी शिकारीचा आनंद साजरा करत होत्या. नदीवर पसरलेल्या पाण्याच्या तलावातून मगर बाहेर आली. तिला शिकारीचा वाटा हवा होता. ती गुपचूप सिंहीण आणि शावकांपर्यंत पोहोचली. Shocking! माणूस चावला, श्वान रुग्णालयात; मुक्या जीवाची भयानक अवस्था भुकेले सिंह आपली शिकार सोडून मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळे ते आपल्या जागी तसेच थांबले. यामुळे मगर आणि सिंहांमध्ये लढाई सुरू झाली. मगरीलाही हार मानायची नव्हती. ती पुन्हा पुन्हा शिकार हिसकावण्याचा प्रयत्न करत होती. सिंहीणांना घाबरवण्यासाठी ती वारंवार त्यांच्यावर झेप घेत होती. पण हे फार काळ टिकलं नाही. कारण मगर जमिनीवर काहीही करू शकत नाही हे सिंहिणींच्या लक्षात आलं. त्यांच्यासाठी मगर हा पाण्यात धोका आहे.
अखेर मगरीला ही शिकार सोडावी लागली. सिंहीणींनी आपली मेजवानी आरामात चालू ठेवली आणि मगर दुरून पाहत राहिली. अशी लढाई जंगलात फार दुर्मिळ पाहायला मिळते. कारण मगरी कधीच शिकार हिसकावण्यासाठी बाहेर पडत नाहीत. मात्र, पाण्यात त्या नक्कीच सिंहाच्या शत्रू आहेत आणि म्हणूनच जंगलाचा राजा पाण्यात शिरण्यास घाबरतो.