जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आधी शरीरिक संबंध, मग 51 वार... CCTV फुटेजमुळे उघडलं राज

आधी शरीरिक संबंध, मग 51 वार... CCTV फुटेजमुळे उघडलं राज

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आरोपीनं तरुणीला असं संपवलं की पुरावाच सापडणार नाही, पण 1 हजार CCTV कॅमेरानं त्याचं पितळ उघडं पाडलं

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 03 जानेवारी : एका 20 वर्षीय तरुणीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. यातरुणीचा मृतदेह घरातील खोलीत रक्ताच्या थरोळ्यात पडलेला पोलिसांना आढळला आहे. या घटनेचा तपास केला असता, सीटीटीव्ही कॅमेरात धक्कादायक प्रकार समोर आला. या कॅमेरामुळे आरोपीचा संपूर्ण खेळ फसला. या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम केले असता, आरोपीने त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने 51 वार केल्याचे समोर आले. तसेच या तरुणीवर बलात्कार केलं असल्याचं देखील उघड झालं. ही घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. हे ही वाचा : शेकोटी घेण्यासाठी लावलेला जुगाड असा फसला, आता आयुष्यभर राहिल लक्षात; पाहा Viral Video याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला राजनांदगाव येथून अटक केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 1000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झडती घेतली. त्यानंतर त्यांचे बँक खाते तपासण्यात आले. ज्यानंतर प्रेम त्रिकोणातून या तरुणीची हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपीच्या बँक डिटेल्सवरून पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर आरोपी अहमदाबादला गेला होता. खून करण्यापूर्वी त्याचे शारीरिक या तरुणीसोबत संबंध ठेवले होते. मुलीच्या खून प्रकरणाच्या तपासात आरोपीने प्रथम मुलीचा चेहरा उशीने दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मृतदेहावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. आरोपीने मुलीच्या छातीवर, गळ्यावर, चेहऱ्यावर आणि पाठीवर अनेक वार केले होते. मुलीच्या मानेवर, छातीवर, चेहऱ्यावर आणि पाठीवर 51 खोल जखमा होत्या. हे ही वाचा : महिलेनं विनाकपडे सुसाट पळवली बाईक आणि… पुढे जो प्रकार घडला तो धक्कादायक या घटनेदरम्यान, मुलीला वाचवण्यासाठी धडपडही झाली, त्यामुळे तिच्या हाताला धारदार शस्त्राने दुखापत झाली. आवाज करू नये म्हणून आरोपीने मुलीचे तोंड उशीने दाबले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात