मुंबई 02 जानेवारी : देशात सगळीकडे हिवाळा सुरु आहे. उत्तर भारतात तर या काळात कडाक्याची थंडी असते. अशा थंडीत काहीही काम करणं कठीण होऊ बसतं. अशावेळी लोक कसे गरम राहाता येईल याकडे लक्ष देतात. ज्यामध्ये गरम कपडे घालणे आणि शेकोटी पेटवणे या गोष्टी मोठ्या प्रमाणत केल्या जातात. देशात जवळ-जवळ सर्वत्रच थंडीमध्ये शेकोटी पेटवली जाते. कचरा, कागद, लाकूड किंवा चिंदी अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या मदतीने शेकोटी पेटवली जाते. त्याच्या अवतीभोवती लोक बसतात आणि गरमी घेतात, हे सगळं तुम्ही पाहिलंच असेल. हे ही पाहा : कडाक्याच्या थंडीत तरुणाने लावली युक्ती, अंघोळीसाठीचा हा देसी जुगाड एकदा पाहाच पण यासंबंधीत एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला तुमचं हसू थांबवता येणार नाही. हा व्हिडीओ फारच मजेदार आहे. शेकोटी घेताना या व्यक्तीसोबत असं काहीतरी घडलं की आता यानंतर तो शेकोटी घेताना शंभर वेळा विचार करेल. नक्की असं काय घडलं? एक व्यक्ती शेकोटी घेण्यासाठी शेकोटीच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. आनंद साजरा करताना ही व्यक्ती त्या शेकोटीच्या भवती नाचत देखील होती. अशावेळी ही व्यक्ती थोडी खाली झुकली, ज्यामुळे त्याच्या शरीराच्या मागे आग लागली. ही आग आधी कमी होती, पण थोड्यवेळाने ती वाढली, ज्यामुळे या व्यक्तीच्या पॅन्टसोबत तिच्या शर्टाने देखील पेट घेतला. ही घटना लक्षात येताच. आग विझवण्यासाठी ही व्यक्ती इकडे-तिकडे पळू लागली.
या व्यक्तीने जमीनीवरती देखील बसून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या व्यक्तीने आपला शर्ट देखील काढला पण त्याच्या मागच्या बाजूला लागलेली आग काही विझली नाही. अखेर या व्यक्तीने जवळील पाणी साचलेल्या हौदामध्ये उडी मारली, ज्यानंतर ही आग विझली.
हा थक्क करणारा मजेदार व्हिडीओ s.k_roy701 नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावर लिहिलं आहे की, ‘भाई की ठंड छुट गई’. २४ डिसेंबर रोजी शेअर केलेल्या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. यावर लोकांनी भरभरुन कमेंट देखील केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.