जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'माझा नवरा नामर्द आहे...', दीराच्या हत्येनंतर वहिनीचा धक्कादायक खुलासा

'माझा नवरा नामर्द आहे...', दीराच्या हत्येनंतर वहिनीचा धक्कादायक खुलासा

दीराच्या मृत्यूचं गुढं उलगडलं

दीराच्या मृत्यूचं गुढं उलगडलं

या प्रकरणार एका वहिनीनेच आपल्या दीराची हत्या केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर लोकांना धक्काच बसला आणि सर्वत्र या प्रकाराबद्दल चर्चा सुरु आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 जुलै: साधारणपणे दीर आणि वहिनीचं नातं प्रेमाने भरलेलं असतं, पण एक अशी घटना हरियाणामधून समोर आली आहे ज्याबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. खरंतर या प्रकरणार एका वहिनीनेच आपल्या दीराची हत्या केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर लोकांना धक्काच बसला आणि सर्वत्र या प्रकाराबद्दल चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शेखपुरा गावात आजम खान या १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह एका तलावात सापडला होता. मृतदेहावर चाकूने वार केले स्पष्ट दिसत आहे शिवाय मृताच्या डोळ्यावर देखील अनेक वार झाले आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होते. या हत्येचं गूढ उकलण्यासाठी पोलिस वेगवेगळ्या गोष्टींना जोडू पाहात होते. त्यानंतर कुटुंबातील काही लोकांची चौकशी केली असता पोलिसांच्या संशयाची सुई शेजारी राहणाऱ्या रोहितभोवती फिरली. पोलिसांनी रोहितची कसून चौकशी केली असता याप्रकरणातील सत्य समोर आलं.

News18लोकमत
News18लोकमत

खरंतर रोहित आणि तमन्ना (मृत व्यक्तीची वहिनी) यांचे बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये अनेकदा अवैध संबंधही निर्माण झाले होते. तमन्ना ही आझम खानची वहिनी आहे आणि आझम खानचा भाऊ गफ्फार याचे लग्न 6 वर्षांपूर्वी तिच्याशी झाले होते. रोहितसोबत तमन्नाचे अफेअर लग्नाच्या 1 वर्षानंतरच सुरू झाले. दोघांमध्ये अवैध संबंध निर्माण होऊ लागले. दोघांनीही एकदा गफ्फारला मारण्याचा कट रचला होता, त्यासाठी रोहितने विष आणले आणि ते तमन्नाला दिले, जेणेकरून ती आपल्या नवऱ्याला ते घालून त्याला मारु शकेल, ज्यानंतर तमन्ना आणि रोहितचा मार्ग मोगळा होईल, परंतू तसं घडलं नाही. त्यापूर्वीच बकरीदच्या काही दिवस आधी तमन्नाच्या घरी कोणी नसताना सर्वजण बाहेर गेले होते, मग तमन्नाने रोहितला घरी बोलावले आणि दोघांमध्ये अवैध संबंध निर्माण झाले, तेव्हा दीर आझम खान तेवढ्यात घरी आला आणि त्याने या दोघांनाही विचित्र अवस्थेत पाहिले. खऱ्या आयुष्यात ‘हम दिल दे चुके सनम’; नवऱ्यानं सर्वांसमोर बायकोचं लावलं प्रियकराशी लग्न आझम खानने कोणाला सांगू नये, म्हणून त्या दिवशी रोहितने स्वत:च्या हाताची नसही कापली जेणेकरून तो भावनिकरीत्या आझमला ब्लॅकमेल करू शकेल, पण त्यानंतर रोहित आणि तमन्ना मिळून आझम खानच्या हत्येचा कट रचतात. बकरीदला रोहित आझमला बाहेर बोलावतो आणि चाकूने त्याच्यावर वार करतो. त्याला मारण्यापूर्वी त्याच्या शरीरावर अनेक वार केला जातात. त्यावेळी त्याच्या डोळ्यावरही चाकूने वार केले होते. आझम खानची हत्या केल्यानंतर रोहितने त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला. त्यानंतर जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा पोलीसांना या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला, ज्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. तमन्नाने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत पोलिस चौकशीत सांगितले की, तिचा पती गफ्फार लैंगिकदृष्ट्या कमकुवत (नपुंसक) असल्याने ती रोहितच्या जवळ आली. तमन्नाने सांगितले की, माझे हे मूल देखील रोहितचे आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात