मुंबई, 07 जुलै : सिनेमात काही वेळेला अशा काही गोष्टी दाखवण्यात येतात की त्या खरा आयुष्यात होणं सहजासहजी शक्य नाही. त्यांपैकीच एक म्हणजे 1999 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’. ज्यामध्ये नवरा आपल्या बायकोचं तिच्या प्रियकराशी भेट होण्यासाठी मदत करुन देतो. तसंच काहीसं प्रकरण वास्तविक जीवनात देखील घडलं आहे. जे बिहारमधून समोर आलं आहे. ज्याबद्दल ऐकून सर्वच जण थक्क झाले आहेत. बिहारच्या नवादा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराशी पुन्हा भेटण्यास मदत केली आणि तिचे त्याच्याशी लग्न केले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एका बायकोचं तिच्या नवऱ्याच्या उपस्थितीत आपल्या प्रियकराशी लग्न लावण्यात आलं. जवळील शिवमंदिरात त्यांचं लग्न लावण्यात आलं. यामध्ये महिलेचा प्रियकर तिच्या भांगेत सिंदूर (कुंकु) लावताना दिसतो आणि लोक आपल्या मोबाइल फोनमध्ये हे सर्व रेकॉर्ड करत आहेत. टोमॅटोची चोरी थांबवण्यासाठी विक्रेत्याचा भन्नाट जुगाड, फोटो एकदा पाहाच व्हिडीओमध्ये ती महिला असह्यपणे रडताना दिसत आहे कारण तिचा प्रियकर तिच्याशी लग्न करणार आहे. परंतु या प्रियकराला मारहाण देखील झालेली दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमा आहेत. त्याच्या एका डोळ्याला देखील मार लागलेलं दिसत आहे. मध खरं की खोटं कसं ओळखायचं? व्यक्तीनं सांगितली ट्रीक, पाहा Video नक्की हा प्रकार काय? नवरा कामानिमित्त बाहेर असताना महिला रात्री उशिरा प्रियकराला त्याच्या घरी भेटायला गेली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. दुर्दैवाने, या जोडप्याला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रंगेहात पकडले, ज्यानंतर त्या दोघांनाही मारहाण करण्यात आली. ज्यानंतर त्यांना एका खोलीत डांबून ठेवले आणि दोघांनाही गाव सोडून जाण्यास सांगण्यात आले.
मात्र, जेव्हा महिलेच्या नवरा परत आला आणि त्याला हा संपूर्ण प्रकार कळला तेव्हा त्याने या जोडप्याला गावातील मंदिरात नेले आणि त्यांचं लग्न लावून दिलं. या महिलेचा प्रियकरही विवाहित असून त्याला तीन मुलं आहेत.