Home /News /viral /

Oh no! ट्रकला वाचवता वाचवता हवेत उडत पाण्यात कोसळली क्रेन; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Oh no! ट्रकला वाचवता वाचवता हवेत उडत पाण्यात कोसळली क्रेन; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

नदीतून ट्रकला बाहेर काढणाऱ्या क्रेनसोबतच मोठी दुर्घटना घडली.

    भुवनेश्वर, 05 ऑगस्ट : काही वेळा एखाद्याला संकटातून वाचवणारा स्वतःच संकटात सापडतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक क्रेन एका ट्रकला वाचवण्यासाठी गेली. पण क्रेनने ट्रकला उचलताच ती हवेत उडाली आणि ट्रकसोबत क्रेनही पाण्यात कोसळली. ही भयंकर दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे (Crane fall down into river while lifting truck). ट्रक, बस यासारख्या अवजड वाहनांचा अपघात झाला. या गाड्या एखाद्या ठिकाणी कोसळल्या की त्यांना वाचवण्यासाठी क्रेनची मदत घेतली जाते. अशाच एका ट्रकचा अपघात झाला. अनियंत्रित होऊन ट्रक पुलावरून नदीत कोसळला. या ट्रकला नदीतून बाहेर काढण्यासाठी दोन क्रेन मागवण्यात आल्या. पण एका क्रेनचा या ट्रकला वाचवता वाचवताच अपघात झाला. व्हिडीओत पाहू शकता क्रेनची केबल पाण्यात पडलेल्या ट्रकला जोडून ट्रक पाण्यातून बाहेर काढला जात होता. उंच पुलावर असलेली क्रेन खोल असलेल्या पाण्यातून ट्रकला वर खेचत होती. त्याचवेळी क्रेनची केबल तुटली आणि ट्रक पुन्हा पाण्यात कोसळला. हे वाचा - स्टंट करता करता रस्त्यावर कोसळला, बाईकने फरफटत नेलं; अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO ट्रक पुन्हा पाण्यात गेलाच पण त्याचवेळी त्याला वर खेचणारी क्रेनही हवेत उडाली. क्रेनची मागील दोन्ही चाकं वर झाली आणि क्रेन हवेत उडत थेट त्याच पाण्यात कोसळली ज्या पाण्यात ट्रक कोसळला होता. व्हिडीओत दुर्घटना पाहूनच आपल्याला धडकी भरते. ज्यावेळी क्रेन पाण्यात कोसळली तेव्हा क्रेन ऑपरेटरही त्यात होता. त्याला वाचवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत होते. पण क्रेन पाण्यात पडताच तो क्रेनमधून लगेच बाहेर पडला. सुदैवाने त्याला पोहोता येत होतं, म्हणून तो स्वतःच पोहोत पाण्यातून बाहेर आला.  त्याला गंभीर दुखापत झाली पण पोहोता येत असल्याने त्याचा जीव वाचला. हे वाचा - चालत्या कारमधून रस्त्यावरून पडली चिमुकली; मागून भराभर गाड्या आल्या आणि...; धक्कादायक VIDEO essence world युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही घटना ओडिशाच्या तालचेर शहरातील असल्याचं सांगितलं जातं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Odisha, Viral, Viral videos

    पुढील बातम्या