बीजिंग, 04 ऑगस्ट : रस्ते अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक चिमुकली चालत्या कारमधून रस्त्यावर पडली. सिग्नलवर खिडकीतून बाहेर डोकावत असताना अचानक गाडी सुरू झाली आणि मुलगी कारमधून बाहेर कोसळली. त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे (Girl fall from moving car). गाडीतून डोकं, हात बाहेर काढू नये, असं वारंवार सांगितलं जातं. पण तरी बहुतेक लहान मुलं असं करतात आणि अशावेळी पालकांनी दुर्लक्षपणा केल्यास काय घडू शकते, हे या व्हिडीओतून दिसून येतं आहे. मुलगी गाडीतून पडल्यानंतरही तिच्या पालकांचा सर्वात मोठा बेजबाबदारपणा समोर आला आहे. ज्याबाबत संताप व्यक्त केला जातो आहे. हे वाचा - स्टंट करता करता रस्त्यावर कोसळला, बाईकने फरफटत नेलं; अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर चौकात सिग्नल लागला आहे आणि गाड्या थांबल्या आहेत. सर्वात पुढे दोन गाड्या दिसत आहेत. त्यापैकी पांढऱ्या रंगाच्या कारच्या खिडकीतून एक मुलगी बाहेर येताना दिसत आहे. मुलीचं निम्म शरीर गाडीच्या बाहेर आहे. इतक्या ग्रीन सिग्नल मिळतो आणि कार सुरू होते. त्याचवेळी चिमुकली कारच्या खिडकीतून बाहेर रस्त्यावर पडते. धक्कादायक म्हणजे मुलगी रस्त्यावर पडल्यानंतर ड्रायव्हरचं लक्षच नाही तो आपली गाडी घेऊन तिथून निघून जातो.
Heights of Careless parents.#China - Child falls out of #car window in Ningbo, China. pic.twitter.com/rowxkQL62P
— Siraj Noorani (@sirajnoorani) August 3, 2022
मुलगी रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगवर पोटावर पडते. ती तशीच पडून राहते आणि मोठमोठ्याने रडते. ज्या कारमधून ती पडली ती कार किंवा त्यातील कुणीच पुन्हा मागे येताना दिसत नाही. रस्त्यावर मागून येणाऱ्या सर्व गाड्या थांबतात. या गाड्यांमधील लोक त्या मुलीच्या मदतीसाठी गाड्यांमधून पटापट बाहेर येतात. एक व्यक्ती त्या मुलीला उचलून घेते आणि रस्त्याच्या किनाऱ्याजवळ जाते. मुलगी कुणाची आहे याचा शोधही हे लोक घेतात. हे वाचा - बापरे! चिमुकलीच्या अंगावर चढला खतरनाक साप आणि…; काळजाचं पाणी पाणी करणारा VIDEO ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार ही घटना चीनच्या निंगबो शहरातील आहे. सिराज नूरानी नावाच्या ट्विटर युझरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आई-वडीलांच्या बेजबाबदारपणाची हद्द असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सनीही अशा पालकांबाबत संताप व्यक्त केला आहे.

)







