नवी दिल्ली, 03 ऑगस्ट : रस्ते अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बहुतेक अपघात हे चालकाचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि हिरोगिरीच्या नादात होतात. कित्येक तरुण ड्रायव्हिंग करताना स्टंट करण्याचा प्रयत्न करतात आणि हाच स्टंट त्यांच्या जीवावर बेततो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बाईक स्टंट असताना तरुणाचा भयंकर अपघात झाला आहे. एका तरुणाने रस्त्यावर बरीच वाहनं जात असताना त्यातून आपली बाईक भरधाव नेली. हिरोसारखी वाऱ्याच्या वेगाने तो वाकडीतिकडी सुसाट बाईक पळवत गेला. पण पुढच्याच क्षणी तो रस्त्यावर तोंडावर आपटला. त्यानंतर काय घडलं ते तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी पाहा. व्हिडीओत पाहू शकता एक तरुण बाईकवरून भरधाव वेगाने जातो आहे. त्याने बाईकचा वेग इतका ठेवला आहे की मोठमोठ्या गाड्यांना मागे टाकत तो वाऱ्याच्या वेगाने पळतो आहे. बाईक चालवतानाही तो हवेत उडाल्यासारखा ड्राइव्ह करतो. नागमोडी वळणं घेत बाईक चालवतो. पण काही वेळातच त्याची ही हिरोगिरी बाहेर पडते. हे वाचा - एक छोटीशी चूक आणि पेट्रोल पंपवर गाडीने घेतला पेट; धडकी भरवणारा VIDEO थोडं पुढे गेल्यावर बाईकवरील त्याचं नियंत्रण ढासळतं आणि तो बाईकसह रस्त्यावर कोसळतो. तो तोंडावर आपटतो. काही अंतरापर्यंत बाईक त्याला फरफटत नेते. पुढे जाऊन बाईक त्याच्यापासून वेगळी होते आणि पुढे जाऊन थांबते. तरुण पाहतच राहतो.
Road par nahi chalegi TUMHARI MARZI,
— Delhi Traffic Police (@dtptraffic) August 3, 2022
Aise stunts karoge toh jodne ke liye bhi nahi milega KOI DARZI!#SpeedKills #RoadSafety pic.twitter.com/RFF7MR26Ao
सुदैवाने त्याने हेल्मेट घातलेलं आहे म्हणून त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. शिवाय मागून येणाऱ्या गाड्याही सावधच होत्या. नाहीतर रस्त्यावर इतक्या गाड्या होत्या की एखाद्या गाडीखाली हा तरुण चिरडण्याची भीतीही होती. हे वाचा - VIDEO - शिंगांवरून हवेत उडवत जमिनीवर आपटत होता रेडा; निर्जीव कारने वाचवला मुलाचा जीव अवघ्या 36 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहूनच धडकी भरते, काळजाचा ठोका चुकतो. दिल्ली वाहतूक पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिीडओ पोस्ट केला आहे. लोकांना सुरक्षित राहण्याचं आणि वेगाने गाडी न चालवण्याचं आवाहन त्यांनी या व्हिडीओमार्फत केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बऱ्याच युझर्सनीही ड्रायव्हिंग करताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.