नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी: पाळीव आणि वन्य प्राण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. या व्हिडीओमधून मनोरंजन होत असल्याने नेटकऱ्यांची त्याला चांगलीच पसंती मिळत असते. सध्या गायींच्या कळपाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत कळपातील एक गाय रस्त्याच्या मध्यभागी अशा पध्दतीनं चालत जाताना दिसतेय की ती जणू रॅम्पवॉक (Ramp Walk) करत असल्याचा भास होतो. रस्त्याच्या मध्यभागी चालणाऱ्या या पांढऱ्या आणि तपकिरी रंगाच्या गायीमुळे एका सुंदर दृश्याची निर्मिती झाली आहे. या गायीच्या पाठीमागे अन्य गायी देखील चालताना दिसत आहेत.
ทำไมเราต้องมานั่งขำอะไรแบบนี้ด้วยเนี่ย 5555555555555555 https://t.co/peMruwBSm4
— 🧸⁷ (@emesspace) February 22, 2021
(वाचा - VIDEO भुकेने तडफडत बछड्याने सोडला जीव; पुढे बिबट्याने जे केलं ते पाहून हादराल )
हा व्हिडीओ 2018 पासून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत आहे, परंतु ट्विटरवर (Twitter) हा व्हिडीओ नुकताच पुन्हा एखदा शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखोवेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या गायीला काही दुखापत झालीय का किंवा ती आजारानं ग्रस्त आहे का असे प्रश्न नेटकऱ्यांनी (Netizens) उपस्थित केले आहेत. याबाबत एक युजर म्हणतो की, ही एक दर्जेदार गाय आहे. तर विनोदबुध्दी असलेली गाय प्रथमच पाहण्यात आली. हे खूप मजेदार आहे, अशा प्रतिक्रिया युजरकडून येत आहेत. (वाचा - वडील समजून भलत्याच व्यक्तीला घेतलं WhatsApp ग्रुपमध्ये; सहा महिन्यांनी उघडकीस आलं सत्य )
तर एका युजरनं दिसताना हे मजेशीर दिसत असलं तरी त्या गायीसोबत काहीतरी चुकीचं घडलं असण्याची शक्यता आहे, असं म्हटलं आहे. डिसेंबरमध्ये ओडीशातील (Odisha) एका जखमी वासराला पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या टेम्पोमागे त्या वासराची गाय पळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या टेम्पोच्या वेगात ती गाय पळत होती. सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत या गायीनं त्या टेम्पोचा पाठलाग केला होता, असा व्हिडीओही याआधी व्हायरल झाला होता.