नवी दिल्ली 26 ऑक्टोबर : काही लोकांना घातक खेळ खेळणं आवडतं. तर काहींना स्वतःचा जीव धोक्यात टाकण्यातही वेगळीच मजा येते. काही लोक तर असेही असतात जे स्वतःहूनच मृत्यूच्या तोंडात जातात. एक असाच विचित्र व्यक्ती चीनची राजधानी बिजिंग येथे एका प्राणीसंग्रहालयात पाहायला मिळाला (Foolish Stunt in Zoo). या माणासानं इकडे तिकडे न पाहता थेट वाघांच्या समोरच उडी घेतली (Man Confronts ELEVEN Tigers After Jumping from Car). हे पाहताच तिथे उपस्थित लोक प्रचंड घाबरले. या घटनेचा व्हिडिओ (Shocking Video Viral) समोर आला आहे.
वादळवाऱ्यातच आकाशातून कोसळल्या भल्यामोठ्या गारा; गाड्यांचा अक्षरशः चुराडा
ही भीतीदायक घटना 23 ऑक्टोबरला बिजिंगच्या प्राणीसंग्रहालयात (Beijing Wildlife Park) घडली. इथे भरपूर प्रमाणात व्हिजिटर्सही उपस्थित होते. इतक्यात एका व्यक्तीनं 11पांढऱ्या वाघांसमोर जात स्टंट दाखवण्यास सुरुवात केली. हे पाहून तिथेच उपस्थित सगळेच घाबरले. इतकंच नाही वाघदेखील बघतच राहिले. स्टाफनं मनाई करूनही या व्यक्तीनं काहीही ऐकलं नाही आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकला.
प्राणीसंग्रहालयात फिरण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं सेल्फ ड्रायव्हिंग टुरची सर्व्हिस घेतली होती. या सुविधेंतर्गत टूरिस्ट स्वतःच ड्रायव्हिंग करून आपल्या मनाने फिरू शकतात. जिप चालवता चालवता हा व्.क्ती वाघांसमोर आला आणि लगेचच त्याने जिपमधून खाली उडी घेतली. स्टाफनं त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने ऐकलं नाही. 11 वाघांसमोर उभा राहून हा व्यक्ती जणू त्यांना हल्ला करण्यासाठी भाग पाडत होता. तिथे उपस्थित लोक त्याला थांबवत राहिले. मात्र, ३० सेकंदाच्या या क्लिपमध्ये जणू हा व्यक्ती मरण्यासाठीही तयार आहे, असं वाटतं.
Shocking! आधी रस्त्यावर एकत्र आल्या 50 एअर होस्टेस; मग काढू लागल्या कपडे अन्...
जेव्हा इथे उपस्थित लोकांना या व्यक्तीचा जीव धोक्यात असल्याचं वाटलं तेव्हा त्यांनी त्याला वाचवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न सुरू केले. वाघांचं लक्ष विचलित करण्यासाठी या लोकांनी त्यांना खायला टाकण्यास सुरुवात केली. तिथे उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. यूट्यूबवर शॉर्ट न्यूजने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या 56 वर्षीय व्यक्तीला अटक केली. त्याचं नाव जियांग असं आहे. याआधीही सुरक्षा व्यवस्थित नसल्याने प्राणीसंग्रहालयात 2016 साली एका महिलेचा जीव गेला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.