• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कुत्रा सांगतो भविष्य, सोशल मीडियावर झालाय स्टार; पाहा VIDEO

कुत्रा सांगतो भविष्य, सोशल मीडियावर झालाय स्टार; पाहा VIDEO

सोशल मीडियावरून भविष्य (Dog turns astrologer gets famous on social media) सांगणारा एक कुत्रा सध्या चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.

 • Share this:
  न्यूयॉर्क, 26 ऑक्टोबर: सोशल मीडियावरून भविष्य (Dog turns astrologer gets famous on social media) सांगणारा एक कुत्रा सध्या चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. अनेकांना भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. रोज सकाळी उठल्यानंतर आपला दिवस कसा जाईल, हे जाणून (How will be the day today) घेण्यासाठी ते राशीभविष्याचा आधार घेतात. ज्योतिषशास्त्रानुसार जो सल्ला दिला जातो, त्यानुसार ते आपल्या दिवसाची योजना आखत असतात. मात्र सध्या एखाद्या ज्योतिषाप्रमाणे चक्क एक कुत्रा लोकांचं भविष्य सांगतो आहे. कुत्र्याचं भविष्य अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या जोनाथन ग्रेजिआनो यांच्या मालकीचा हा कुत्रा आहे. त्याचं नाव नूडल. नूडल हा भविष्य सांगण्यात माहीर आहे, असं जोनाथन यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नूडलनं नेमकं काय भविष्य सांगितलंय, ते जोनाथन सोशल मीडियातून जाहीर करतात. त्यांच्या या उपक्रमाला नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Noodle (@showmenoodz)

  असं सांगतो भविष्य आजचा दिवस कसा जाईल, हे सांगण्याच्या नूडलच्या दोन पद्धती आहेत, असं जोनाथन यांना वाटतं. नूडल झोपेतून उठल्यावर काय करतो, याकडे त्याचं लक्ष असतं. नूडल झोपेतून उठल्यावर जर पुन्हा झोपला तर तो दिवस ‘नो बोन्स डे’ आहे, असं मानलं जातं. त्यादिवशी कुठलंही मोठं आणि आव्हानात्मक काम करू नये, असा सल्ला दिला जातो. तर ज्या दिवशी नूडल झोपेतून उठल्यावर चालायला किंवा खेळायला लागतो, तो दिवस चांगला असून मोठी आव्हानं घ्यायला आणि अनेक दिवसांपासून खोळंबलेली कामं मार्गी लावायला हरकत नाही, असं मानलं जातं. सोशल मीडियावर आहे व्हायरल वास्तविक, ही भविष्यवाणी जोनाथनकडून जाहीर केली जाते. मात्र लोक नूडललाच स्टार मानतात. त्याचे सोशल मीडियावर अनेक हजारो फॉलोअर्स आहेत. दररोज नूडलचा एक नवा व्हिडिओ अपलोड केला जातो आणि भविष्यप्रेमी तो पाहतात.
  Published by:desk news
  First published: