नवी दिल्ली 11 मार्च : एका जोडप्याला अतिशय कठीण आणि भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला. असा दुर्घटनेचा प्रसंग याआधी क्वचितच कोणाच्याही आयुष्यात घडला असेल, जेव्हा कोणी अपघातात गंभीर जखमी झालेलं असेल आणि तेव्हाच दुसरं मोठं संकट येऊन कोसळलं. कार अपघातात जखमी झालेल्या मात्र जिवंत वाचलेल्या भुकेल्या सिंहांनी वेढलेल्या पती-पत्नीसाठी ही एक त्रासदायक रात्र होती. या रात्री ते सुखरूप वाचले हा एक चमत्कार असल्याचं या जोडप्याने म्हटलं. गेल्या सप्टेंबरमध्ये, 46 वर्षीय मारियो टायटस त्याच्या 34 वर्षीय पत्नी ग्रेसला उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यामुळे रुग्णालयात घेऊन गेला होता. हे जोडपं दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या पालकांच्या घरापासून 124 मैलांच्या अंतरावर होतं, तेव्हा त्यांचा कार अपघात झाला. स्टंटच्या नादात भयानक अपघात; उंचावरुन दुचाकीसह खाली पडला अन्…, Shocking Video अपघातानंतर त्यांची कार रस्त्यावरुन काही अंतर खाली गेली. कार अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. या धडकेत ते झाडावर आदळले, त्यामुळे त्यांची कार क्रॅश झाली आणि ग्रेस यांची सहा हाडे तुटली आणि त्यांच्या शरीरावर खोल जखमा झाल्या. तीन मुलांच्या आईचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. ती शुद्धीत होती, परंतु ती किंवा मारियो दोघांनाही आपत्कालीन सेवांवर कॉल करणं जमलं नाही. हे जोडपं रूग्णालयापासून फक्त 12 मैलांवर असल्याने, मारिओला आशा होती, की मदतीसाठी ते तेवढ्या दूर जातील. परंतु ग्रेसने सांगितलं की अपघाताच्या काही क्षण आधी त्यांना रस्त्याच्या पलीकडे सिंहांचा एक ग्रुप दिसला होता, याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे कारमध्येच बसून वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. ग्रेसने सांगितलं की, “दुर्घटना होण्यापूर्वी मला रस्त्यावर तीन सिंह दिसले, म्हणून आम्ही म्हणालो की जर आपण मरणार आहोत तर एकत्रच मरू. हे अतिशय भयंकर होतं. चारही बाजूंनी सिंह गर्जना करत होते. मला खूप वेदना होत होत्या. रक्तस्रावामुळे मी अशक्त होत होते.”
दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता एका ड्रायव्हरने हा अपघात पाहिला आणि आपत्कालीन सेवांसाठी संपर्क साधला. यानंतर ग्रेसला कारमधून बाहेर काढण्यात यश आलं. या जोडीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आणि ग्रेस यांना रक्त भरण्यात आलं. ग्रेसने पुढचे पाच महिने हॉस्पिटलमध्ये बरे होण्यासाठी घालवले, परंतु डॉक्टरांनी सांगितलं की हा एक चमत्कार आहे की ती गोठवणाऱ्या थंडीत 12 तास जीवघेण्या जखमांसह वाचली.