नवी दिल्ली 11 मार्च : तसं पाहिलं तर जगात अप्रतिम स्टंट करणाऱ्यांची कमतरता नाही आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे तर लोकांमध्ये लाइक्स आणि व्ह्यूजची क्रेझ प्रचंड वाढली आहे. यासाठी लोक अनेकदा नको ते स्टंट करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. मात्र प्रत्येकाचा स्टंट प्रत्येक वेळी यशस्वी होतोच असं नाही. अनेक वेळा स्टंट अयशस्वी होतात. यानंतर असे काही अपघात घडतात, जे पाहून लोक अचंबित होतात. स्टंटचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण सध्या सोशल मीडियावर आलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला .
आईचं प्रेम! स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने पिल्लाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं..पाहा VIDEO
आपण सर्व जाणतो की, कोणताही स्टंट करणं सोपं नसतं. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मग कुठेतरी जाऊन आपण तो स्टंट करू शकतो. जे पाहून लोकं प्रभावित होतात. मात्र ते करताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे, कारण इथे तुमची एक चूक तुमचा स्टंट खराब करू शकते. याशिवाय गंभीर दुखापतही होऊ शकते. आता हा स्टंटच बघा जिथे व्यक्ती स्टंट पूर्ण करतो पण शेवटी त्याची एक चूक सर्व काही बिघडवते.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की अनेक लोक बाइकसोबत उभे आहेत. यातील एक रायडर येतो आणि स्टंट दाखवू लागतो. तो व्यक्ती बाईक खूप वेगाने चालवतो आणि तिला एका उंच जागेवर स्टंट करण्यासाठी नेतो. पण वर गेल्यावर त्याचा तोल जातो आणि त्याला बाईक आवरता येत नाही. यानंतर ती व्यक्ती बाईकसह खाली कोसळते. एक गोष्ट स्पष्ट आहे की स्टंट दाखवताना त्या व्यक्तीने स्वतःलाच संकटात टाकलं.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 'ankitpatel0817' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो बातमी लिहिपर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. असं करून तुम्ही स्वत:चा जीव धोक्यात घालत आहात, असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर काहींनी प्रोफेशनल्सच्या देखरेखीखालीच स्टंट करणं चांगलं आहे, असा सल्लाही दिला आहे. त्याचबरोबर काही लोकांनी या व्यक्तीचं कौतुक करणाऱ्याही कमेंट केल्या आहेत..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Stunt video