नवी दिल्ली 13 ऑक्टोबर : लोकांना बहुतेकदा जुन्या गोष्टी (Old Artefacts) भरपूर आवडतात. अनेक लोक तर जुन्या वस्तूंचा संग्रहच आपल्याकडे जमा करतात. यासाठी ते बरीच किंमत मोजालयाही तयार असतात. तर, काही लोक असे असतात जे ऐतिहासिक वस्तू विकत घेतात, मात्र त्याच्या किमतीचा त्यांना काहीच अंदाज नसतो. नुकतंच असंच इंग्लंडमधील एका वृद्ध जोडप्यासोबत घडलं. त्यांनी घरात पडून असलेल्या दोन जुन्या मुर्ती (Old Statues) विकण्याचं ठरवलं.
15 वर्षांनी लहान BF ला महिन्याला 15 लाख पगार देते ही महिला; करून घेते हे काम
इंग्लंडच्या सफॉकमध्ये राहणारं एक वृद्ध जोडपं आपलं घर चेंज करत होतं. जुनं घर रिकामं करताना त्यांची नजर गार्डनमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन स्पिंक्सच्या मुर्त्यांवर पडली (Sphinxes Statue in Garden). स्पिंक्स इजिप्तमध्ये (Egypt) स्थित विशाल इमारती आहेत, ज्यांचं शीर माणसाचं तर धड सिंहाचं असतं. या अतिशय ऐतिहासिक इमारती आहेत आणि मिस्रच्या लोकांची हजारो वर्ष जुनी श्रद्धा आहे. या इमारतीची छोटी मूर्ती या कपलनं अनेक वर्षांपूर्वी ३० हजारात खरेदी केली होती. जी त्यांनी आपल्या गार्डनमध्ये ठेवली होती. कपलनं घर बदलताना या मूर्ती फेकून देण्याचा विचार केला. मात्र, नंतर त्यांनी याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटलं, की यातून थोडेफार पैसे येतील.
लिलावासाठी मँडर ऑक्शनर्सला फोन केला गेला. मूर्तीची तपासणी केल्यानंतर सांगण्यात आलं की ही अतिशय जूनी आणि दुर्मिळ मूर्ती आहे. या मूर्तीसाठी २० हजारापासून बोली सुरू झाली. मात्र, या दोन मूर्ती तब्बल २ कोटी रुपयांत खरेदी केल्या गेल्या. ऑक्शनच्या आधी कंपनीच्या जेम्स नावाच्या व्यक्तीनं सांगितलं, की आधी खरेदीदारांनी माहितीच नव्हतं, की ही मूर्ती किती जूनी आहे. त्यामुळे ऑक्शनच्या आधी लोकांना यात कमी रस होता. मात्र, ऑक्शनदरम्यान लोकांनी यात अधिक रस घेतला.
VIDEO: आता आईस्क्रीम डोसा आला चर्चेत; रेसिपी पाहूनच गायब होईल भूक
मिरर वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला हा मूर्ती १८ किंवा १९ व्या शतकातील असल्याचा अंदाज होता. मात्र, नंतर जाणकारांनी दावा केला, की ही मूर्ती ५००० वर्षापूर्वीची वाटत असून ती खरंच मिस्रची आहे. १८ व्या शतकाच ती आसपासच्या इतर देशात आणली गेली.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.