• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: धुम्रपानामुळं विशाल दादलानी गेला होता नैराश्येत; दिवसाला ओढायचा 40 सिगरेट

HBD: धुम्रपानामुळं विशाल दादलानी गेला होता नैराश्येत; दिवसाला ओढायचा 40 सिगरेट

करिअरच्या सुरुवातीस आपला वजनदार आवाज टिकवण्यासाठी तो दिवसाला कमीत कमी 40 सिगरेट ओढायचा. (cigarette addiction) विशालनं स्वत: एका लाईव्ह चॅटमध्ये हा धक्कादायक खुलासा केला होता.

 • Share this:
  मुंबई 28 जून: ‘प्यार में कभी कभी’ (Pyaar Mein Kabhi Kabhi) या गाण्यातून नावारुपास आलेला विशाल दादलानी (Vishal Dadlani) हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध गायक आणि संगीतकार म्हणून ओळखला जातो. विशालचा आज वाढदिवस आहे. (Vishal Dadlani birthday) 48 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. विशाल एक रॉक सिंगर आहे. तो आपल्या खोल आणि वजनदार आवाजासाठी ओळखला जातो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल करिअरच्या सुरुवातीस आपला वजनदार आवाज टिकवण्यासाठी तो दिवसाला कमीत कमी 40 सिगरेट ओढायचा. (cigarette addiction) विशालनं स्वत: एका लाईव्ह चॅटमध्ये हा धक्कादायक खुलासा केला होता. जॅस्मिन भसीननं केला होता आत्महत्येता प्रयत्न; केला धक्कादायक खुलासा सिगरेट ओढल्यामुळं आवाजाला एक वजनदारपणा प्राप्त होतो असा गैरसमज काही वर्षांपूर्वी रुढ होता. त्यामुळं आवाजाच्या क्षेत्रात काम करणारे वॉईज ओव्हर आर्टिस्ट, आर.जे. रॉक सिंगर हा प्रकार सर्रास करायचे. या ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून विशालनं देखील हा प्रयोग केला. पण नंतर त्याला सिगरेटचं व्यसन लागलं. दिवसाला तो कमीत कमी 40 सिगरेट ओढायचा. सिगरेटच्या व्यसनामुळं त्याचा आवाज खराब होऊ लागला. स्वर यंत्रावण अतिरिक्त ताण येऊ लागल्यामुळं वरचे स्वर लावणं त्याला शक्य होत नव्हतं. अखेर त्याला त्याच्या चुकिची जाणीव झाली अन् त्यानं खूप प्रयत्न करुन सिगरेटचं व्यसन सोडलं. धुम्रपान ही अत्यंत वाईट सवय आहे. याचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळं सिगरेटपासून दूर राहा असा सल्ला देखील त्यानं आपल्या चाहत्यांना दिला. बँड ग्रुप सिंगर ते प्रसिद्ध बॉलिवूड गायक; असा होता विशाल दादलानीचा संगीतमय प्रवास यापूर्वी सुमोना चक्रवर्तीनं देखील असाच काहीसा अनुभव सांगितला होता. सोबतच सिगरेटचं व्यसन सोडता यावं यासाठी काही टिप्स देखील दिल्या होत्या. ती म्हणाली होती, “धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीसमोर मी उभं राहणं टाळायचे. सिगरेटची तलफ आली की मी च्युइंगम चघळायचे. भरपूर पाणी प्यायचे. शिवाय सिगरेट शरीरासाठी किती घातक आहे याबद्दल सतत वाचायचे, परिणामी हळूहळू माझं धुम्रपानाचं व्यसन सुटलं. तंबाखूचे व्यसन हा अजार नव्हे, ज्यासाठी औषधाची गरज आहे. हे व्यसन सोडण्यासाठी खंबीर निश्चय करायला हवा.”
  Published by:Mandar Gurav
  First published: