नवी दिल्ली, 25 एप्रिल : कोरोनाव्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनापुढे अनेक देशांनी गुडघेही टेकले आहे. भारतातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे, मात्र या सगळ्या आव्हानांवर भारत मात करण्यास सज्ज आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन भारतासाठी फायद्याचा ठरताना दिसत आहे. असे असले तरी सध्याच्या परिस्थितीत संयम तुटणं स्वाभाविक आहे, मात्र तुमचा मनोबल वाढवणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एक महिला आपल्या चिमुरड्यासोबत कोरोनाला मातवर करण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून देत आहे. या दोघांनी या आपल्या तोंडावर झाडांची पानं लावली आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळं तोंडावर पान लावणाऱ्या या दोघांच्या फोटोनं नक्कीच भारतीयांना एक आशा दिली आहे. वाचा- काम करता करता पोलिसांनी सुरु केला डान्स, कोरोना योद्ध्यांचा VIDEO VIRAL
When a picture is worth a million words !!
— RAHUL SRIVASTAV (@upcoprahul) April 24, 2020
Any Captions ?#maskchallenge #mask #mask4all #coronavirus pic.twitter.com/8uyjInEmn5
वाचा- लॉकडाऊनमध्ये चिमुकलीचा पहिला बर्थडे पोलिसाने बनवला खास, पाहा VIDEO या फोटोवर लोकांनी, निदान गरीबांना याची जाणीव आहे, तेच लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करत असल्याचे मत व्यक्त केले आहे. या फोटोमधून कोरोनासमोर झुकायचं नाही तर त्याला झुकवायचं अशा भावनाही काहींनी व्यक्त केल्या आहेत.
वाचा- माणुसकीचा पाझर, हात नसलेल्या माकडाला पोलीस अधिकारी भरवतोय केळ, VIDEO VIRAL
दामन भारी है उसका,
— Ankit yadav(❤️श्याम 🗝️दीवाना❤️) (@ankit_yadav6151) April 24, 2020
जिसमे जिम्मेदारियां लेकर चलती है वो❤️🙏
वाचा- काय सुरू आणि काय असणार बंद यावर गोंधळू नका, इथे वाचा सविस्तर बातमी दरम्यान, हा फोटो कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही आहे. पण या फोटोतून भारत कोरोना समोर गुडघे टेकणार नाही तर, त्याला नमतं घेण्यास भाग पाडेल, ही भावना नक्की मनात येते. संपादन-प्रियांका गावडे.