नवी दिल्ली, 23 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी जगभरातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, प्रशासन, पोलीस झटत आहेत. दिवस रात्र हे सर्वजण त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. भारतात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस दिवसरात्र तैनात आहेत. त्यांना घरीही जाण्यास मिळत नाही. देशभरात लटकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणारे अनेक लोक आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिस काम करत आहेत. खाकी वर्दी घातलेली तीसुद्धा माणसंच आहेत. त्यांनाही कामातून ब्रेकची गरज आहे. याच काळात सोशल मीडियावर पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी डान्स करताना दिसत आहेत. पोलिसांचा हा व्हिडिओ ठाण्यात बीहू सण साजरा करतानाचा आहे.
नागाव पोलीस स्टेशनने त्यांच्या फेसबुकवरून व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात लिहिलं आहे की, छोटी छोटी खुशिया. रात्रीच्या वेळी कोरोना फायटर्स काम करत होतो आणि त्यावेळचा हा व्हिडिओ. पाहा VIDEO: लपाछपी खेळत असताना वॉशिंग मशिनमध्ये अडकली, तब्बल 3 तासांनी अशी पडली बाहेर कठीण काळात लहान लहान गोष्टींमधून लोकांना आनंद मिळतो. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. पोलिसांवर असलेला ताण यातून कमी होईल अशी भावनाही काहींनी व्यक्त केली आहे. हे वाचा : पगार न मिळाल्याने भूक भागवण्यासाठी security गार्ड खातोय गवत संपादन - सूरज यादव