मुंबई, 25 एप्रिल : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन वाढवून 3 मेपर्यंत केला आहे. पण अशा अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. अनेक व्यापार आणि उद्योगधंद्यांना सरकारकडून परवाणगी देण्यात आली आहे. पण त्यावरून लोकांमध्ये संभ्रम आहे. दारूची दुकानं सुरू झाल्याच्याही अफवा पसरत आहे तर अनेक इतर दुकानंही उघडण्यात आली आहेत. या सगळ्यावर महाराष्ट्र सरकारने दुकाने उघडण्यास परवानगी देण्याच्या आदेशावरील स्पष्टीकरण जारी केले आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागात शॉपिंग मॉल्स सोडून सर्व दुकाने उघडण्याची परवानगी आहे. शहरी भागात किराण्याची दुकानं, शेजारची दुकाने आणि निवासी संकुलांमधील दुकाने उघडण्याची परवानगी आहे. पण यावेळी सोशल डिस्टंसिंगे नियम पाळले गेले पाहिजे. गृहमंत्रालयाकडून सुद्धा 15 एप्रिलला जारी करण्यात आलेल्या पत्रकारमध्ये म्हटलं आहे की, नगरपालिकेच्या हद्दीत येणारी दुकानं सुरू करण्याची परवाणगी देण्यात आली आहे. पण यावेळी सगळ्या नियांमचं पालन होणं महत्त्वाचं आहे. Breaking: नाशिकमध्ये झोपडपट्टीला भीषण आग, 25 ते 30 घरं आगीच्या भक्ष्यस्थानी महाराष्ट्र सरकारनं दिलं स्पष्टीकरण - दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत - पूर्वीप्रमाणे ई-कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची परवानगी नाही - केवळ अत्यावश्यक वस्तू पुरवल्या जाऊ शकतात - ग्रामीण भागातील मॉल सोडून सर्व दुकाने उघडण्याची परवानगी - शहरी भागात निवासी क्षेत्राजवळील सर्व दुकाने, शेजारची सर्व दुकाने आणि एकल दुकाने उघडण्यास परवानगी - बाजारात दुकाने, मार्केट कॉम्प्लेक्स आणि शॉपिंग मॉल्स उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही.
MHA issues clarification on order allowing the opening of shops. MHA release states, "In rural areas, all shops, except those in shopping malls are allowed to open. In urban areas, all standalone shops, neighbourhood shops & shops in residential complexes are allowed to open". pic.twitter.com/SnFT7L1k2j
— ANI (@ANI) April 25, 2020
दुकानात 50 टक्केच कर्मचारी काम करण्याची सूट सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, दुकानदारांना थोड्या प्रमाणात सुट देण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, 50 टक्केच कर्मचारी काम करतील. ते देखील सोशल डिस्टेसिंगनुसार, त्यांना मास्क वापरणं अनिवार्य आहे. मुलगी झाली म्हणून मोठी काकी करायची तिरस्कार, अखेर 1 वर्षाच्या चिमुकलीला संपवलं मॉललामध्ये सूट नाही सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार मॉल आणि सिंगल ब्रँड मॉलला सूट नाही. याचा अर्थ असा आहे की, मॉलमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही. महानगरपालिका क्षेत्रातील बाजार आवारातील दुकानेही आतासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यासह हॉटस्पॉट आणि कंटेनरवर येणारी प्रत्येक छोटी-मोठी दुकाने पुढील ऑर्डरपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 24 तासांत कोरोनामुळे 57 लोकांचा मृत्यू, आतापर्यंत 24,506 रुग्ण पॉझिटिव्ह संपादन - रेणुका धायबर