प्रतिनिधी- विकास सिंह चौहान इंदौर, 13 मे : देशभरात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असतानाच आता मजूर वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. याच दरम्यान मजुरांचे होणार हाल, त्यांच्या समस्या सांगणारे अनेक फोटो व्हिडीओ समोर आले आहेत. सध्या आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे. आतापर्यंत शेतात बैल कमी पडला तर शेतकऱ्यानं नागरण्यासाठी जोताला स्वत:ला जुंपल्याचं ऐकलं असेल पण बैलगाडीतला एक बैल गेल्यानं शेतकऱ्यानं स्वत: बैलासोबत गाडी हाकल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील इंदौरमधील असल्याची माहिती मिळत आहे. इंदौरमध्ये एका बैलावर गाडी हाकणं कठीण झालं म्हणून मजुरानं बैलासोबत बैलगाडीला जुंपलं आणि त्या बैलगाडीतून आपल्या कुटुंबीयांना घेऊन गावी परत जाण्यासाठी निघाला. लॉकडाऊनमध्ये भर उन्हातून बैल आणि मजूर गाडी ओढत होते. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
हे वाचा- मुंबईत 93 वर्षांच्या वृद्ध महिलेनं कोरोनाला हरवलं, डॉक्टरांनीही केलं कौतुक बैलासोबत गाडी ओढत असलेल्या या मजुराचं नाव राहूल आहे. हा महूचा रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी कामधंद्यासाठी तो इंदौरमध्ये आला होता. त्यानं 15 हजार रुपये देऊन बैलगाडी विकत घेतली आणि हमाली सुरू केली. मात्र याच दरम्यान कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हमाली बंद झाली. घरातील पैसेही संपले मग पर्याय नाही म्हणून एक बैल विकला. एका बैलावर गाडी कशी चालवायचा हा प्रश्न समोर होता. 15 हजाराला घेतलेला बैल केवळ 5 हजाराला विकावा लागला. मजबुरीनं पोट भरण्यासाठी आता एकाबैलासह स्वत:ला जुंपून गाडी चालवणं सुरू आहे. अंगावर काटा आणणारे हे फोटो आणि व्हिडीओ आहेत. पोट भरण्यासाठी अक्षरश: स्वत: ला या बैलासोबत जुंपून गाडी ओढण्याची वेळ या मजुरावर आली आहे. पैशांचा बंदोबस्त झाला तेव्हा त्यानं पुन्हा आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला पण एका बैलावर जाता येणार नाही म्हणून त्यानं असं केल्याचं सांगितलं आहे. आपल्या कुटुंबियांना घेऊन गावी जाण्यासाठी वाट धरली. हे वाचा- लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी आला ‘वॉरिअर रोबोट’, पाहा VIDEO हे वाचा- पाकिस्तानात लॉकडाऊनमध्ये तरुणींची वाईट अवस्था, अंगावर शहारे आणणारी आकडेवारी संपादन- क्रांती कानेटकर