चोरांनी ज्याच्या घरी केली चोरी तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, घाबरलेल्या चोरांची अशी झाली अवस्था

चोरांनी ज्याच्या घरी केली चोरी तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, घाबरलेल्या चोरांची अशी झाली अवस्था

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी चोरी पडली महागात, पोलिसांनी अटक केल्यानंतर तुरुंगात न टाकता केलं क्वारंटाइन.

  • Share this:

कटिहार, 13 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं लोक सध्या आपल्या घरांमध्ये कैद आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. असाच एक प्रकार बिहारमध्ये घडला. मात्र चोरी केल्यानंतर चोर जेलमध्ये नाही तर थेट क्वारंटाइन सेंटरमध्ये पोहचला.

हा प्रकार बिहारमधील कटिहारच्या कुर्सेला पोलीस स्थानकाजवळ घडला. येथील परिसरात दोन स्थानिक युवक बिपिन मंडल आणि संतोष मंडल यांनी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरात चोरी केली. मात्र पोलिसांच्या तत्परतेने चोरी करणारे आरोपी ग्रामस्थांच्या मदतीने पकडले गेले. अटक केल्यानंतर दोन्ही दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आणि चोरी केलेले सर्व सामान पोलिसांना दिले.

वाचा-धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्कार; आरोपीसह कैदीही क्वारंटाईन

रिकामं घर पाहून रचला चोरीचा प्लॅन

कोव्हिड पॉझिटिव्ह रूग्णाच्या घरात चोरी केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आणि त्यांना क्वारंटाइन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अमरकांत झा यांनी सांगितले की, कुरसेला पोलीस स्टेशन परिसरातील तीन घारिया गावात एक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबियांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, घर रिकामं असल्याचे पाहून या चोरट्यांनी चोरी करण्याचा प्लॅन रचला होता.

वाचा-पाकिस्तानात लॉकडाऊनमध्ये तरुणींची वाईट अवस्था, अंगावर शहारे आणणारी आकडेवारी

दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी सध्या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या घरात चोरी झाल्याच्या आरोपावरून पोलीसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना क्वारंटाइन केले आहे. दोघांचीही पुढील चौकशी आणि कोरोना टेस्ट केली जाणार आहे.

वाचा-अमेरिकेचा सर्वात मोठा खुलासा, चीन आणि WHOचा असा होता कोरोना संदर्भातला प्लॅन

दिल्लीत आरोपींनी कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर केला होता बलात्कार

तिहार तुरुंगात बलात्काराच्या (Rape) प्रकरणात आलेल्या एका आरोपीला आयसोलेट करण्यात आलं आहे. याशिवाय आरोपीची कोरोना चाचणी (Covid -19) करण्यात आली आहे. आरोपीवर ज्या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे, ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली आहे. या बातमीनंतर जेल प्रशासन हादरलं आहे. या आरोपीसोबत राहणाऱ्या दोन कैद्यांनाही विविध ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. हे तिघे जेल नंबर – 2 मध्ये राहत असल्याचं सांगितलं जात आहे. डीजी तिहार जेल प्रशाननाने सांगितले आहे की, तुरुंगात आलेल्या सर्व कैद्यांना 14 दिवसांपर्यंत क्वारंटाइन करण्यात येतं. जेल क्र. 2 मध्ये बिहारचे माफिया डॉन शहाबुद्दीन आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन बंद आहेत. हे कोणाच्याही संपर्कात आले नसल्याचं सांगितलं जात आहे.

First published: May 13, 2020, 11:44 AM IST

ताज्या बातम्या