माद्रिद, 16 एप्रिल : कोरोना विषाणूमुळे जगातील सर्व देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुले लोकं अस्वस्थ झाले आहेत. जवळजवळ एक महिना घरात बंदिस्त असलेल्या लोकांना आता घराबाहेर पडायचे आहे. स्पेनमध्ये अशीच एक महिला लॉकडाऊनचे उल्लंघन करत रस्त्यावर आली. जेव्हा पोलिसांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिनं अंगावरील सर्व कपडे काढण्या सुरुवात केली.
लॉकडाऊनबाबत स्पेनमध्ये अत्यंत कठोर पावले उचलली गेली आहेत. कोणालाही बाहेर पडायला परवानगी नाही. परंतु या 41 वर्षीय महिलेनं लॉकडाऊनला कंटाळून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ही महिला खरतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्यावर उतरली होती. मात्र पोलिसांना पाहताच तिनं घाबरून कपडे काढण्यास सुरुवात केली आणि गोंधळ घातला. एका गाडीवर उभी राहत ती टाळ्या वाजवत असताना पोलिसांनी तिला पाहिलं, या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा-पाण्यापासून दारूपर्यंत सगळं फ्री तेही घरपोच! संगीत दिग्दर्शकाची अनोखी सेवा
वाचा-VIDEO : रस्त्यावर सांडलेलं दूध जेव्हा माणूस आणि कुत्रे एकाचवेळी पितात तेव्हा...
त्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक करून तिला न्यायालयात नेले. कोर्टाने स्कत ताकिद देत जामिनावर या महिलेची सुटका केली. तसेच, लोकांनी कोरोनाचे संक्रमण टाळ्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही केले.
वाचा-'तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर...', पोलिसांचा हा VIDEO पाहाच
दुसरीकडे स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे 1.77 लाखाहून अधिक लोक आजारी आहेत. या व्यतिरिक्त 18 हजार 579 लोकांचा मृ्त्यू झाला आहे. मृत्यू आणि संक्रमित लोकांच्या बाबतीत स्पेन जगात दुसर्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona