मुंबई, 14 मे : देशभरात कोरोना व्हायरसचं संकट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक छोटे उद्योगधंदे बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रोजगार बंद झाला आहे. उसाचा रस म्हटलं की आपल्याला दुकानात लावलेलं यंत्र आणि घुंगरांचा आवाज एवढंच पटकन डोळ्यासमोर येतं. पण एका तरुणानं या लॉकडाऊनमध्येही चांगला उद्योग सुरू केला आहे. एका तरुणानं जुगाड करून त्यानं उसाचा रस काढण्याचं यंत्र कारच्या बोनेटमध्ये तयार केलं आहे. कारच्या पुढचा भाग खराब झालेला असल्यानं त्यानं जुगाड करून ऊस काढण्याचं यंत्र बसवून केला. या जुगाडू आणि मेहनती तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता या कारच्या बाहेरच्या बाजूला तरुणानं यंत्र बसवलं आहे. त्यामध्ये ऊस घालून तो रस काढत आहे. ही गाडी तो एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकतो.
हा व्हिडीओ 4.7 हजार लोकांनी पाहिला आहे. तर 165 जणांनी लाइक केला आहे. एका युझरनं तर 5 रुपयांच्या उसाच्या रसासाठी 2 लाखांची गाडी असाही सवाल विचारला आहे. या तरुणाच्या जुगाडाचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. सध्या देशात रोजगाराची बिकट परिस्थिती आहे. भाड्यानं दुकानं घेऊन असा काही छोटा उद्योग करणंही खिशाला परवडणारं नाही अशा परिस्थित जुगाड करून या तरुणानं आपला हा छोटा उद्योग सुरू केला आहे. हे वाचा- येत्या 6 महिन्यात 5 लाख लोकांचा मृत्यू होणार, ‘हा’ आजार ठरणार कारण हे वाचा- मुंबईच्या या भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, BMC ने घेतला निर्णय संपादन- क्रांती कानेटकर