मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईच्या या भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, BMC ने घेतला महत्त्वूपर्ण निर्णय

मुंबईच्या या भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, BMC ने घेतला महत्त्वूपर्ण निर्णय

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

45 दिवस अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगलेल्या या लोकांना थोडासा दिलासा मिळत आहे.

मुंबई, 14 मे : कोरोनाने मुंबईत शिरकाव केल्यानंतर 28 मार्च 2020 पासून सील अर्थात प्रतिबंध घालण्यात आलेला मुंबईतील दाट लोकवस्तीच्या भाग म्हणजे वरळी कोळीवाडा. याच भागातील लोकांना आता जरा मोकळा श्वास घेता येणार आहे. कारण या भागातील काही इमारती आणि रस्ते सोडून इतर भागातील प्रतिबंध महापालिका शिथिल करणार आहे. तसे पत्र जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे या यांनी पोलिसांना लिहिले आहे. या पत्रात त्यांनी 16 जागा सोडून इतर भागातील प्रतिबंध कमी करत असल्याचं सांगितलं आहे. म्हणजे आता या भागात इतर भागप्रमाणे लॉकडाऊन असेल. पण संपूर्ण कोळीवाडा सील नसेल. गेले 45 दिवस या लोकवस्तीत लोकांना घराबाहेर सुध्दा पडता येत नव्हते. केवळ औषध घेण्यासाठी किंवा महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांसाठी घरातील एका व्यक्तीला घरा बाहेर पडता येत होते. त्याव्यतिरिक्त विशेषतः पुरुषांना घराबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे 45 दिवस अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगलेल्या या लोकांना थोडासा दिलासा मिळत आहे. मुळातच कोळीवाडा इथं लोकांची घरं अगदी लहान आहेत. इतक्या छोट्या घरात 45 दिवसांकरता बंदिस्त राहाणं हे कोणालाही सोपं नव्हतं. परंतु वरळी कोळीवाडा परिसरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता प्रशासनानं अतिशय कडक निर्बंध लागले होते आणि या प्रभागातील लोकांना त्याचे पालन करावेच लागले. आता मात्र त्यांच्या या कष्टाचे फळ त्यांना मिळत आहे, असे म्हणावे लागेल. कारण या भागातील धोरणाचा प्रभाव कमी होत सल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. हेही वाचा - कोरोनामुळे ग्रामीण भागात भयंकर स्थिती, अंगावर शहारा आणणारी माहिती समोर त्यामुळे राम सिंग चाळ, जनसेवा बाळवाडी, गोल्फा देवी मंदिर, क्रांती गल्ली, हिरा शेठ चाळ, अमर प्रेम चौक पारवडी गल्ली, गोंदेकर हाऊस, सोनापूर लेन, गोल्फा देवी मंदिर मागची बाजू, नवसाई क्रीडा मंडळ, तरे गल्ली, मातोश्री हाऊस, मातृछाया निवास, बाळा पाटील हाऊस या 16 जागा वगळता इतर भागात हे निर्बंध कमी करण्यात आले आहेत. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या