मुंबई, 13 मे : छोट्या छोट्या गोष्टींसमोर आपण अगदी सहज हार मानतो आणि कंटाळून जातो. सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. या व्हायरस विरोधात लढण्यासाठीही गरज आहे ती जिद्द आणि इच्छा शक्तीची. मनानं हार मानली तर या जगात काहीच शक्य नाही हे सांगणारा आणि जिद्द आणि उमेद निर्माण करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये युवक हार न मानता आपलं काम करत आहे. जिद्द आणि प्रेरणा देणारा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. 17.4 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
Very inspiring. Thank you for sharing. I got reminded about counting my blessings and never give up. 🙏
— Ratnakar Panigrahi (@RatnakarOdisha) May 13, 2020
हे वाचा- ज्याच्या घरी केली चोरी तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, आता चोरांची अशी झाली अवस्था
Salute 🙏🙏
— RS (@pichatis) May 13, 2020
After watching this types of videos we are getting positive vibes.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की हात नसलेला हा तरुण दोन्ही पायांच्या मदतीनं माती गोळा करत आहे. शारीरिक व्यंग असतानाही हार न मानता या तरुणानं आपलं काम युक्तीनं सुरू ठेवलं आहे. फावड्यात माती भरायची आणि पायानंच फावड्यावर जोरात पाय ठेवून माती ट्रॅक्टरमध्ये फेकायची. हा व्हिडीओ फार प्रेरणा देणारा आहे. कितीही मोठं संकट आलं तरीही हार मानायची नाही. प्रयत्न करत राहायाचं. प्रयत्न केले नाहीत तर फळ कसं मिळणार आणि प्रत्येक छोट्या गोष्टीत हार मानली तर पुढे कसं जाणार? हा व्हिडीओ प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचं युझर्सनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा- एक बैल कमी पडला म्हणून गाडीला स्वत:ला जुंपलं, निःशब्द करणारा VIDEO हे वाचा- Lockdown मध्ये कपालभाती करणारी ही खार झाली स्टार, पाहा VIDEO संपादन- क्रांती कानेटकर