कोलंबिया, 25 एप्रिल : कोरोनामुळं सध्या जगातील जवळजवळ सर्व देश लॉकडाऊनमध्ये आहेत. घरात कैद असलेल्या लोकांचा संयम सुटत चालला आहे. तर दुसरीकडे याच लॉकडाऊनमध्ये चक्क लोकं प्रेमात पडत आहेत. कोरोना शेल्टरमध्ये असेच एका जोडप्याचे प्रेम फुलले आणि त्यांनी विवाह केलाय मारिया ओसोरिओ आणि अल्फोन्सो अर्डीला यांची भेट घर नसलेल्या लोकांसाठी बांधण्यात आलेल्या शेल्टर होममध्ये झाली. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, मारिया 39 वर्षांची आहे. मी एक मिशनरीमध्ये काम करते. पैसे नसल्यामुळे गेला एक महिना मारिया कोलंबियातील मनिझालेस येथील एका शेल्टर होममध्ये राहत आहे. दरम्यान अल्फोन्सो मजूरीचे काम करतो. लॉकडाऊनमुळे सध्या सर्व कामे बंद असल्यामुळे तो ही या शेल्टर होममध्ये राहण्यास आला. येथेच त्यांची भेट झाली. वाचा- लॉकडाऊनचा कंटाळा बघा! बोअर झाला म्हणून 15 कोटी कमवणारा अवलिया झाला डिलिव्हरी बॉय दोघही एकमेंकाना आपल्या पडतीच्या काळात भेटले. लॉकडाऊनमुळे दोघांकडेही काम नव्हते. राहण्यासाठी जागा नव्हती. ते म्हणतात, कधीकधी प्रेम हे अनेपेक्षित ठिकाणी होते, तसा काहीसा प्रकार या दोघांच्या बाबतीत घडला. अल्फोन्सोनं न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या माहितीत, “आम्ही सामाजिक अंतरचे कधीच उल्लंघन केले नाही. आम्ही शेल्टर होममध्ये राहत असल्यामुळे इतर काम केल्यानंतर मोकळा वेळ असायचा. त्यामुळं आम्ही खूप गप्पा मारायला लागलो. आमची परिस्थिती तशी सारखी होती. माझ्या डोक्याला दुखापत झाल्यामुळं मारिया माझी खूप काळजी घ्याची. आनंद आहे की लॉकडाऊनमध्ये मला आयुष्यभरासाठी सोबती मिळाला”, असे सांगितले. वाचा- ‘कोरोनाच्या संकटातही प्रेम आणि आशेचा किरण’, नर्स दाम्पत्याचा PHOTO VIRAL मुख्य म्हणजे मारिया आणि अल्फोन्सो यांच्या लग्नात वऱ्हाडी म्हणून शेल्टर होममधील इतर लोकं उपस्थित होती. दोघांनी मास्क घालूनच लग्न केले. सध्या मारिया आणि अल्फोन्सो यांना एक वेगळा तंबू देण्यात आला आहे. दरम्यान लॉकडाऊन संपल्यानंतर दोघं सगळ्यात आधी आपल्या कुटुंबाला भेटणार आहे, असे मारियानं सांगितले. वाचा- बाल्कनी, एक चिठ्ठी आणि लॉकडाऊन! पहिल्या नजरेत तरुणी घायाळ, असा सुरू झाला रोमान्स लॉकडाऊनमध्ये प्रेम फुलल्याचे हे पहिले प्रकरण नाही, याआधी इटलीमध्ये तर भारतातही अशी प्रकरणे समोर आली आहेत. एकूणच काय तर लॉकडाऊनचा फायदाही होत असल्याचे दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.