बाल्कनी, एक चिठ्ठी आणि लॉकडाऊन! पहिल्या नजरेत तरुणी घायाळ, असा सुरू झाला रोमान्स

बाल्कनी, एक चिठ्ठी आणि लॉकडाऊन! पहिल्या नजरेत तरुणी घायाळ, असा सुरू झाला रोमान्स

लॉकडाऊनमध्ये फुललं प्रेम, बाल्कनीमध्ये social distancing पाळत पठ्ठ्याने असं केलं तरूणीला इम्प्रेस.

  • Share this:

रोम, 20 एप्रिल : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जगातील बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे लोकं तब्बल एक महिना घरात कैद आहे. केवळ आवश्यक सामना खरेदी करण्यासाठी लोकांना घराबाहेर पडण्याची मुभा आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमध्ये अनोख्या प्रेम कथाही समोर येत आहेत. मात्र एका कपलची प्रेमकथा एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी आहे.

ही अजब प्रेमकथा इटलीमध्ये घडली. एकीकडे लोकं लॉकडाऊनमुळे ग्रासले असताना यांची मात्र बाल्कनीमधून प्रेम कथेला सुरुवात झाली. इटली हा कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांपैकी एक आहे. अशातच इटलीच्या व्हेरोना येथे राहणारे 39 वर्षीय पाओला अग्नेली आणि 38 वर्षीय मायकल डी'प्लाउस एकमेकांच्या प्रेमात पडले.

पाओलाने एका रेडिओ कार्यक्रमात भाग घेताना तिच्या अनोख्या प्रेमाबद्दल सांगितले. पाओलाने सांगितले की, "बाल्कीनमध्ये उभे असताना त्यांची नजर भिडली. त्यानंतर मायकलने चादरीवर आपले नाव लिहिले होते आणि ते छतावर लटकवले होते". खरतर सामुदायिक कॉन्सर्ट ऐकण्यासाठी ही लोकं बाल्कनीत जमले होते. यावेळी पाओला आणि मायकेल यांची नजरानजर झाली.

वाचा-लॉकडाऊनमधला विवाह! अ‍ॅपवरून मेक्सिकन मुलगी पटवून पठ्ठ्यानं 30 दिवसांत उडवला लग्नाचा बार

वाचा-20 मिनिटं आकाशात दिसले रहस्यमय 'बर्निंग ट्रेल', VIDEO पाहून शास्त्रज्ञ चक्रावले

या कॉन्सर्टमध्ये पाओलाची बहीण लिसा बाल्कनीत व्हायोलिन वाजवत होती. व्हायोलिन संगीत ऐकत असतानाच मायकेलने पाओलाला पाहिले. पहिल्याच नजरेत दोघांना प्रेम झाले. डेली मेलच्या वृत्तानुसार पाओलाने, "मी जेव्हा प्रथम मायकलला पाहिले तेव्हा लगेच प्रेमात पडले. त्याच्या बाबतीतही असेच घडले. आम्ही जेव्हा एकमेकांना पाहिले तेव्हा वातावरण खुपच रोमँटिक होते", असे सांगितले.

वाचा-...आणि अचानक रस्त्यावर पाडला पैशांचा पाऊस, CCTV फुटेजनंतर आलं सत्य समोर

बाल्कनीमध्ये एकमेकांना पाहिल्यानंतर या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांशी बोलण्यास सुरुवात केली, परंतु लॉकडाउननंतरच ते भेटतील असा निर्णय घेतला.

First published: April 20, 2020, 12:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या