फ्लोरिडा, 17 एप्रिल : कोरोना व्हायरसला लढा देत असताना जगभरातील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. यात काही फोटो सकारात्मक तर काही नकारात्मक परिस्थिती सांगणारे आहेत. कोरोनाच्या भीतीच्या वातावरणातही प्रेम आणि आशा निर्माण करणारा एक फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. बेन केयर आणि मिंडी ब्रॉक या नर्स दाम्पत्याचा हा फोटो आहे. दोघेही रुग्णालयात सोबत बराच वेळ असतात. याआधी त्यांना प्रेम दाखवण्यात कोणत्या अडचणी नव्हत्या पण कोरोनामुळे मर्यादा येत आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि संसर्गापासून वाचण्यासाठी त्यांना अंतर ठेवावं लागत आहे. मात्र यातही त्यांच्या प्रेमाचा फोटो व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेला फोटो 30 मार्च 2020 ला काढण्यात आला आहे. निकोल हबार्डने हा फोटो टिपला. यामध्ये बेन आणि मिंडी दोघेही पूर्णपणे सुरक्षित असं किट घालून आहेत. डोक्यालासुद्धा हेल्मेट असून फक्त डोळेच दिसत आहेत. फोटोत ते एकमेकांच्या डोळ्यात पाहताना दिसतात. 46 वर्षीय बेन केयर म्हणतो की, 'प्रत्येकजण या फोटोबद्दल बोलत आहे. सध्या सगळेच अशा परिस्थितीतीन जात आहे. आणि हा आशेचा आणि प्रेमाचं प्रतिक आहे.' बेनची पत्नी मिंडी ब्रॉक म्हणते की,'आपण एकमेकांसोबत आहे, सोबत काम करतोय आणि एकमेकांना आधार देतोय हे महत्वाचं आहे. फक्त बेन आणि मी नाही तर प्रत्येक माणूस'
फ्लोरिडात राहणारं हे दाम्पत्य फक्त सोबत राहतं असं नाही. ते एक काम करतात आणि एकाच धेयासाठी झटतात. सध्याही त्यांच्याकडे असलेली जबाबदारीसुद्धा जोखमीची आहे. सर्जरीच्यावेळी रुग्णांच्या श्वासनिलकेत पाइप घालण्याचं काम ते करतात. यातील एखाद्याला कोरोना झाला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
हे वाचा : ज्याचं कोणी नाही त्याच्यासाठी पुढे आले पोलीस, त्या महिलेवर केले अंत्यसंस्कार
दोघांची भेट नर्स अनेस्थेसिया स्कूलमध्ये 2007 ला झाली. तिथं बसण्याची व्यवस्था ही नावाच्या अद्याक्षरावरून होती आणि ब्रॉक केयरच्या पुढे होती. तेव्हापासून आम्ही सोबत असल्याचं ब्रॉकने वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना म्हटलं आहे. पाच वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केलं. आता ते टीम हेल्थ नावाच्या मेडिकल स्टाफिंग फर्मसाठी काम करतात.
हे वाचा " Social Distancing यांच्याकडून शिका! मानवालाही लाजवेल असा PHOTO VIRAL
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus