मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'मुलाची शपथ घेऊन सांग भाजपलाच मतदान केलं, तरच वीज जोडणार'; आमदाराचा VIDEO VIRAL

'मुलाची शपथ घेऊन सांग भाजपलाच मतदान केलं, तरच वीज जोडणार'; आमदाराचा VIDEO VIRAL

या व्हिडिओमध्ये आमदार गावकऱ्यांना म्हणत आहेत, की मुलाची शपथ घेऊन सांगा की तुम्ही भाजपला (BJP) मतदान केलं आहे. तुम्ही शपथ घेतली तरच वीज जोडली जाईल

  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 13 जुलै : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) शाहजहांपूर जिल्ह्यातील कटरा येथील भाजप आमदार वीर विक्रम सिंह (Veer Vikram Singh) यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार गावकऱ्यांना म्हणत आहेत, की मुलाची शपथ घेऊन सांगा की तुम्ही भाजपला (BJP) मतदान केलं आहे. तुम्ही शपथ घेतली तरच वीज जोडली जाईल.

आगीत उडी घेत महिलेला वाचवून ठरला हिरो; घटनेत आलेल्या ट्विस्टनं पोहोचला गजाआड

आमदार वीर विक्रम सिंह एका गावात वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. यादरम्यान एका गावकऱ्यानं त्यांच्याकडे वीज जोडण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना आमदार गावकऱ्यांना म्हणाले, की तुमच्या गावात आम्हाला मतं मिळाली नाहीत. त्यामुळे तुम्हाला लाईट मिळणार नाही. तुम्ही मला मत दिलेलं नाही त्यामुळे माझ्याकडून कामाची अपेक्षाही करू नका, असंही ते म्हणाले.

दीपिकाच्या गाण्यावर आजीबाईंचा धम्माल डान्स VIDEO; उत्साह पाहून व्हाल थक्क

आमदार पुढे म्हणाले, की आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे आणि सांग की तू भाजपला मतदान केलं आहे. तरच मी तुम्हाला वीज जोडून देईल. याचबरोबर, ज्यावेळी गावकऱ्यांनी आपली तक्रार असल्याचे सांगितलं, त्यावेळी आमदार म्हणाले, की 'तुम्ही ज्याला मतदान देता, त्याच्याकडे तक्रार करा. जर तुम्ही मला मत दिले असते तर तुम्हाला माझ्या छातीवर चढण्याचा अधिकार आहे. तुम्ही आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करु नका.' आमदार वीर विक्रम सिंह यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

First published:

Tags: BJP, Uttar pradesh, Video viral