नवी दिल्ली 12 डिसेंबर : प्रेम फक्त माणसंच करतात असं नाही. प्राणी आणि पक्षीदेखील आपल्या जोडीदारावर तितकंच प्रेम करतात. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की अनेकदा प्राणी आणि पक्षीही माणसापेक्षा जास्त समजदारपणा दाखवतात. या व्हिडिओमध्ये कोंबडीला वाचवण्यासाठी कोंबडा जे काही करतो, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल (Cock Clashed with a Man to Save Chicken).
पाळीव माकडाला दिले ड्रग्ज अन्...; महिलेनं केलेलं संतापजनक कृत्य जाणून हादराल
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की कोंबडा आपल्या कोंबडीला वाचवण्यासाठी थेट एका युवकासोबतच भिडतो. यादरम्यान कोंबडा असं काही करतो, जे पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या हैराण करणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोंबडा या युवकाच्या तावडीतून कोंबडीची सुटका करण्यात यशस्वीही होतो. व्हिडिओ पाहून लोक कोंबड्याची हिंमत आणि कोंबडीवर असणारं त्याचं प्रेम, याचं कौतुक करत आहेत.
Partners.....👌👌
Jab koi baat bigad jaye😢😢 Tum dena saath mera....💐💐 pic.twitter.com/UG3yttBYGR — Rupin Sharma IPS (@rupin1992) December 2, 2021
व्हिडिओची सुरुवात एका हॉलपासून होते. यात कोंबडा आणि कोंबडी एकसोबत फिरताना दिसतात. इतक्यात इथे एक व्यक्ती येतो आणि तो कोंबडीला उचलून आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून कोंबडा भडकतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोंबडा आपल्या चोचीने या व्यक्तीवर हल्ला करू लागतो. मात्र यावेळी कोंबडीला वाचवण्यात तो अपयशी ठरतो.
ग्राहकाने वेट्रेसला दिलेली टीप पाहून मॅनेजरही भडकला; तरुणीची नोकरीवरून हकालपट्टी
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तो व्यक्ती कोंबडीला पकडून एका छोट्या जाळीत बंद करतो. यानंतर मात्र कोंबडा जे काही करतो, ते हैराण करणारं आहे. कोंबडा वरती चढून आपल्या चोचीने याचा दरवाजा उघडतो. यानंतर लगेचच कोंबडी बाहेर येते. हा व्हिडिओ IPS ऑफिसर रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी खास मेसेजही लिहिला आहे. 'जब कोई बात बिगड़ जाए, तुम देना साथ मेरा' असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओ दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.