नवी दिल्ली 28 ऑगस्ट : साप (Snake) किती घातक असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या सापासोबत तुमचा सामना होतो तेव्हा परिणाम काय होईल, याची कल्पना न केलेलीच बरी. मात्र, सापाच्या आणि कोंबड्याच्या लढाईत सापाला हार मानावी लागली तर? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात एक कोंबडा सापासोबत भिडताना (Cock and Snake Fight Video) दिसत आहे. चिमुकल्यानं केली वडिलांची पोलखोल; सर्वांसमोरच सांगितलं बाथरूमध्ये काय करत होते साप आणि कोंबड्याच्या लढाईचा हा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter Video) Viral Hog नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. कारण या व्हिडिओमध्ये दिसतं, की कोंबड्याच्या समोर सापानं हार मानली आहे आणि काही सेकंदातच साप तिथून पळ काढतो. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की काळ्या रंगाचा एक साप कोंबड्यांच्या जाळीमध्ये एका कोपऱ्यात बसलेला आहे, जणू तो शिकारीसाठी वाट पाहत आहे. इतक्यात एक व्यक्ती तिथे येतो आणि काठीच्या मदतीनं या सापाला तिथून हटवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, इतक्यात कोंबडा तिथे येतो आणि सापाला खाली पाडतो. यानंतर लगेचच त्याच्यावर हल्ला करू लागतो. कोंबड्याच्या या हल्ल्यानंतर साप तिथून पळ काढतो.
This brave chicken managed to successfully chase off a black racer snake! 😲🐍🐔#viralhog #snake #chickens #brave #standyourground #Georgia pic.twitter.com/9zKG5IInWM
— ViralHog (@ViralHog) August 25, 2021
मोबाइलवर बोलण्याच्या नादात आई बाळालाच विसरली; Video पाहून लोकांचा संताप सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की बहुतेक आज सापाचा लढण्याचा मूड नाही. तर, दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं, की ही लढाई खरंच फार मजेशीर आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 27 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.