मराठी बातम्या /बातम्या /Viral /Cigarette smoking चा भयंकर Video; पाहिल्यानंतर सिगारेट ओढणं सोडा साधं नावही काढणार नाहीत

Cigarette smoking चा भयंकर Video; पाहिल्यानंतर सिगारेट ओढणं सोडा साधं नावही काढणार नाहीत

सिगारेट ओढणं ही तुमची चूक आहेच पण सिगारेट ओढल्यानंतरही किती तरी लोक इतकी मोठी चूक करतात की ती त्यांच्याच नाही तर इतरांच्याही जीवावर बेतू शकते.

सिगारेट ओढणं ही तुमची चूक आहेच पण सिगारेट ओढल्यानंतरही किती तरी लोक इतकी मोठी चूक करतात की ती त्यांच्याच नाही तर इतरांच्याही जीवावर बेतू शकते.

सिगारेट ओढणं ही तुमची चूक आहेच पण सिगारेट ओढल्यानंतरही किती तरी लोक इतकी मोठी चूक करतात की ती त्यांच्याच नाही तर इतरांच्याही जीवावर बेतू शकते.

मुंबई, 25 डिसेंबर :  सिगारेट स्मोकिंग (Cigarette smoking) म्हणजे हल्ली फॅशनच समजली जाते. धूम्रपान (Smoking video) आरोग्यासाठी हानिकारक आहे, असं सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतानाही लोक बिनधास्तपणे स्मोकिंग करतात. सिगारेट ओढण्याचे आरोग्यावर किती गंभीर दुष्परिणाम आहेत (Cigarette smoking side effect) हे माहिती असलं तरी त्याची पर्वा न करता लोक सिगारेट ओढतात. सिगारेट ओढल्यानंतर अशी चूक करतात, ज्याचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो याचा तुम्ही विचारही केला नसेल. असाच एक भयंकर व्हिडीओ (Shocking video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

सिगारेट ओढणं ही तुमची चूक आहेच पण सिगारेट ओढल्यानंतरही किती तरी लोक इतकी मोठी चूक करतात की ती त्यांच्याच नाही तर इतरांच्याही जीवावर बेतू शकते. सिगारेटच्या दुष्परिणामाचा असाच हा खतरनाक व्हिडीओ आहे. जो पाहिल्यानंतर सिगारेट ओढणं सोडा तुम्ही सिगारेटचं साधं नावही काढणार नाहीत. सिगारेटचा असा व्हिडीओ तुम्ही याआधी क्वचित पाहिला असेल.

हे वाचा - कोरोनामुळे भयंकर अवस्था; तरी Lung transplant शिवायच शौर्यने जिंकला आयुष्याचा लढा

सिगारेट ओढणारे सिगारेट संपत येताच ती फेकून देतात. सिगारेट फेकताना ती विझवणं गरजेचं असतं. काही जण ती पायाखाली चिरडतात. तर काही जण तशीच फेकून देतात. अशीच चूक करणं एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. त्याच्यासोबत मोठी दुर्घटना घडली आहे, ज्यामुळे त्याचा जीवही गेला असता.

View this post on Instagram

A post shared by Meme wala (@memewalanews)

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती सिगारेट ओढत येते. सिगारेट संपत येताच ती त्याला फेकायची असते. रस्त्यावर चालताना त्याला समोर एक खड्डा दिसतो. त्याच खड्ड्यात ही व्यक्ती सिगारेट न विझवताच फेकते आणि काही क्षणातच मोठा ब्लास्ट होतो. हा ब्लास्ट इतका मोठा असतो की जमिनीला मोठा खड्डा पडतो. ती व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली दबते. गंभीररित्या जखमी होते. कशीबशी ती जमिनीवरून उठण्याचा प्रयत्न करते.  कदाचित याठिकाणी गॅस पाइपलाइन असावी. लिकेजमुळे हा ब्लास्ट झाला असावा.

हे वाचा - VIDEO - नवरदेवाचं तोंड पाहताच नवरीबाईची सटकली; लग्न राहिलं बाजूला आधी केली धुलाई

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मीमवाला न्यूज इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Cigarette, Shocking viral video, Smoking, Viral, Viral videos