Home /News /viral /

VIDEO - नवरदेवाचं तोंड पाहताच नवरीबाईची सटकली; लग्न राहिलं बाजूला आधी केली धुलाई

VIDEO - नवरदेवाचं तोंड पाहताच नवरीबाईची सटकली; लग्न राहिलं बाजूला आधी केली धुलाई

लग्नमंडपात नवरदेवाचं ते रूप पाहून नवरीबाईने त्याला आधी चोपून काढलं.

    मुंबई, 25 डिसेंबर : लग्नात (Wedding video) नवरीला (Bride video) पाहिलं तर ती अगदी लाजताना, गालातल्या गालात हसताना, हळूच नजर वर करून आपल्या नवरदेवाकडे (Groom video) पाहत डोळ्यांनी इशारे करताना दिसते. पण सध्या अशा एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जी यापैकी काहीच करताना दिसत नाही आहे (Bride groom video). अगदी याच्या उलट तिने केलं आहे. लग्न राहिलं बाजूला नवरीबाईने आधी नवरदेवाची धुलाई केली आहे (Bride beaten groom video).नवरीबाईने भरमंडपात सर्वांसमोरच नवरदेवाला चोप दिलं आहेत (Angry bride video). नवरदेवाचं तोंड पाहताच तिची सटकली. ती आऊट ऑफ कंट्रोल झाली आणि तिने त्याला मारायलाच सुरुवात केली. नवरीबाईने असं केल्यानंतर तिथं उपस्थित त्यांचं कुटुंब, नातेवाईक आणि पाहुणेही हैराण होतं. पण कुणीच काही बोलत नाही. असं नेमकं तिथं झालं तरी काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हे वाचा - मित्रांचा प्रताप अन् नवरदेवाला नवरीसमोर झुकवावी लागली मान; काय घडलं पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता लग्नमंडपात नवरा-नवरी एकमेकांसोबत बसले आहेत. लग्नाच्या विधी सुरू असतात. त्याचवेळी नवरी नवरदेवाला पाहते आणि तो गुटखा खात असल्याचं त्याला दिसतं. ते पाहून ती भडकते आणि त्याला चोपायालच सुरुवात करते. त्याला तिथून उठायला सांगते.  नवरीबाईचं असा रुद्रावतार पाहून नवरदेवालाही घाम फुटतो. तो काहीही न बोलतात गुपचूप तिथून उठतो आणि तिथून थोडं दूर जातो आणि पुन्हा मागे येतो. @santoshsaagr  ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. गुटखा खाऊन नवरा लग्नमंडपात बसला होता. नवरीने थप्पड मारून त्याला गुटखा थुंकायला लावलं. दारू पिणाऱ्या, गुटखा खाणाऱ्यांना अशीच पत्नी मिळूदे ही प्रार्थना मी देवाकडे करतो. भारतीय नारी सर्वांवर भारी. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हे वाचा - कारमध्ये झोपलेल्या नवरीसोबत असं काही केलं की...; नवरदेवाचा प्रताप कॅमेऱ्यात कैद नवरदेव लग्नाच्या दिवशीही गुटखा खाताना दिसला. लग्नाच्या विधी सुरू असताना त्याचं तोंडही सुरू होतं. ते नवरीला बिलकुल आवडलं नाही. त्याला गुटखा चघळताना पाहून तिने त्याला तिथंच चांगला धडा शिकवला. तिने कशाचीही, कुणाचीही पर्वा न करता नवरदेवाला ताळ्यावर आणलं.  एकंदर व्हिडीओवरून स्पष्ट होतं की नवरीबाईने नवरदेवाला गुटखा थुंकायला सांगितला आणि नवरदेव तेच थुंकून पुन्हा मागे आला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

    पुढील बातम्या