Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनामुळे फुफ्फुसाची भयंकर अवस्था; तरी Lung transplant शिवाय 12 वर्षांच्या शौर्यने जिंकला आयुष्याचा लढा

कोरोनामुळे फुफ्फुसाची भयंकर अवस्था; तरी Lung transplant शिवाय 12 वर्षांच्या शौर्यने जिंकला आयुष्याचा लढा

कोरोनामुळे फुफ्फुसाचं गंभीर इन्फेक्शन झालेला 12 वर्षांचा मुलगा  फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवायचक ठणठणीत झाला आहे.

    हैदराबाद, 25 डिसेंबर : कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाल्यानंतर त्यावर मात करणाऱ्या बऱ्याच जणांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. बहुतेक लोकांना तर फुफ्फुसांचा आजार(Lung Disease) झाला आहे. अवघ्या 12 वर्षांचा मुलगा शौर्यही अशाच आजाराशी झुंज देत होता. यामुळे त्याचं फुफ्फुस खिळखिळं झालं तरी फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवायच त्याने आयुष्याचा लढा जिंकला आहे. भारतातीलच नव्हे तर आशियातील असं पहिलं प्रकरण आहे. लखनऊमध्ये राहणारा शौर्य  (Shaurya) ऑगस्टमध्ये त्याला कोरोना असल्याचं निदान झालं. सुरुवातीला तपासणीत त्याला व्हायरल न्युमोनिया (Pneumonia) असावा असं समजून तसे उपचार करण्यात आले. पण त्याला फुफ्फुसाचं गंभीर इन्फेक्शन झालं होतं. लखनऊतील डॉक्टरांनी त्याच्या पालकांना त्याचं लंग ट्रान्सप्लांट म्हणजे फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याचे आईवडील त्याला उपचारासाठी हैदराबादला घेऊन गेले. हे वाचा - कोरोना लस घेतलेल्यांनाच Omicronने गाठलं; ओमिक्रॉनबाधितांपैकी 91 टक्के Vaccinated कोरोनामुळे त्याला मल्टी ऑर्गन इन्फेक्शन झालं होतं. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेजच्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. सुरुवातीला त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर एक्‍स्‍ट्राकोरपोरील मेम्‍ब्रेन ऑक्‍सिजनेशन म्हणजे ईसीएमओ लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं. ही एक मशीन असते ज्यात शरीरातील रक्त ऑक्जिनेट करण्यासाठी पाठवलं जातं आणि त्यातील कार्बन डायऑक्साइड हटवलं जातं. शौर्य 65 दिवस तो ईसीएमओवर होता. लाइफ सपोर्ट सिस्टमवरच  65 दिवसांनंतर तो बरा झाला. आता त्याला फुफ्फुस प्रत्यारोपणाची गरज पडणार नाही. हे वाचा - Omicron चा धोका वाढला; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली 'ही' भीती एनडीटीवीच्या रिपोर्टनुसार, फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवायच हा मुलगा बरा झाला. याआधी चेन्नईतील 56 वर्षांच्या व्यक्तीनेही 109 दिवसात फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवाय ईसीएमओ आणि वेंटिलेटवर बरी झाली होती. पण शौर्य हा आशियातील पहिला लहान मुलगा आहे, ज्याने इतके दिवस ईसीएमओवर राहून बरा झाला आहे. आता त्याची रुग्णालयात फिजियोथेरेपी सुरू आहे. डॉक्टरांच्या मते, लवकरच त्याला डिस्चार्ज दिला जाणार आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Health, Hyderabad, Lifestyle

    पुढील बातम्या