नवी दिल्ली 27 डिसेंबर : माकड आणि चिंपांझी तुम्ही अनेकदा पाहिले असतील. अनेक लोक या दोन्हीला एकच समजतात मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही प्राणी वेगवेगळे आहेत. असं मानलं जातं की सुमारे 6 दशलक्ष वर्षांपूर्वी चिंपांझी मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेपासून वेगळे झाले, परंतु ते मानवासारखेच अतिशय बुद्धिमान प्राणी मानले जातात. सोशल मीडियावर चिंपांझीचे निरनिराळे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ खळखळून हसवणारे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Chimpanzee Started Laughing after Seeing Magic). हा व्हिडिओ (Funny Video Viral) अतिशय मजेशीर असून लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
35 कोटींची लॉटरी जिंकताच बदललं मन, प्रियकराचं गर्लफ्रेंडसोबत धक्कादायक कृत्य
या व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती चिंपांझीला जादू दाखवतो. हे पाहून चिंपांझी इतका खुश होतो की हसत-हसत तो थेट खाली लोळू लागला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या व्यक्तीच्या हातात एक ग्लास असतो. हा व्यक्ती चिंपांझीला दाखवून काहीतरी वस्तू ग्लासमध्ये ठेवतो आणि ग्लास झाकून ठेवतो. यानंतर तो झाकण खोलून ग्लास चिंपांझीला दाखवतो मात्र यात काहीच नसतं. हे पाहून चिंपांझी अतिशय खुश होतो आणि खाली लोळून हसू लागतो.
Loved the reaction. pic.twitter.com/D6zUP55BhF
— Awanish Sharan (@AwanishSharan) December 26, 2021
या व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळत आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, रिअॅक्शन चांगली वाटली. अवघ्या 30 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 39 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर चार हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
जमिनीवर झोपून शूट करत होती व्हिडिओ; सापाने चेहऱ्यावर केला हल्ला, थरारक VIDEO
अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, बंदर क्या जाने अदरक का स्वाद. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, व्हिडिओमध्ये दुःखद बाब ही आहे की चिंपांझी पिंजऱ्यात कैद आहे. मात्र हे खूप चांगलं आहे की कोणीतरी त्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.