मुंबई 11 एप्रिल : वापरकर्ते बर्याचदा काही उत्कृष्ट आणि मन जिंकणाऱ्या व्हिडिओंच्या शोधात सोशल मीडिया चाळताना दिसतात. अशा परिस्थितीत पाळीव प्राण्यांपासून ते काही वन्य प्राण्यांपर्यंतचे व्हिडिओ वापरकर्त्यांचं मन जिंकण्यात यशस्वी होतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक चिंपांझी सिंहाच्या पिल्लांवर आईप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. Video : जेव्हा हत्ती आणि सिंहिण समोरा-समोर येतात, पुढे जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं ही कठीण साधारणपणे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पिल्लांचे संगोपन व्यवस्थित होतही नाही. अशा परिस्थितीत ते इतर प्राण्यांचे बळी ठरतात आणि आपला जीव गमावतात. वन्यजीव अभयारण्य किंवा प्राणीसंग्रहालयात मात्र प्राण्यांच्या पिल्लांची चांगली काळजी घेतली जाते. याआधी आपण अशा अनेक क्रूर प्राण्यांची पिल्लं पाहिली आहेत, ज्यांच्या पालकांच्या मृत्यूनंतर त्यांना माकडे, चिंपांझी किंवा कुत्र्यांनी सांभाळून मोठं केलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्येही आपण एक चिंपांझी सिंहाच्या पिल्लांसह मजा करताना आणि आईप्रमाणे त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना पाहू शकतो. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या चिंपांझीचे नाव लिंबानी असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये चिंपांझी त्या सिंहाच्या पिल्लांशी अगदी तसाच खेळताना दिसतो, जसं एखादा माणूस मांजरीच्या पिल्लांशी खेळत असतो. सध्या या व्हिडिओला सगळ्यांचीच पसंती मिळत आहे. व्हिडिओमध्ये चिंपांझी त्या पिल्लांना मिठी मारताना आणि प्रेम करताना दिसत आहेत.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर यूजर्सना मंत्रमुग्ध करत आहे. जो वृत्त लिहिपर्यंत सोशल मीडियावर 12 दशलक्षाहून अधिक म्हणजे सुमारे एक कोटी 20 लाख वेळा पाहिला गेला आहे. त्याचवेळी, लाखो वापरकर्त्यांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. एका युजरने कमेंट करून लिहिलं की, प्रेम कसं शेअर करायचं हे माणसापेक्षा लिंबानी चांगलं जाणते. दुसरा म्हणतो, की हेच कारण आहे, ज्यामुळे तो त्याचं इंटरनेट बिल भरतो आणि असे चांगले व्हिडिओ पाहतो.