मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला प्राण्यांशी संबंधीत अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी थरारक शिकारीचे असतात. तर कधी क्यूट प्राण्यांशी संबंधीत असतात. तर कधी-कधी काही व्हिडीओ हे फारच आश्चर्यकारक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ हत्ती आणि सिंहिणीशी संबंधीत आहे. या व्हिडीओत पुढे काय घडणार याची लोकांना उत्सुक्ता असते आणि तेवढ्यात असं काही घडतं जे धक्कादायक आहे.
तसे पाहता हत्ती हा शाकाहारी आणि शांत प्राणी आहे. तो सहसा कोणालाही त्रास देत नाही. पण असं असलं तरी त्याच्या इतकंच रागिष्ट कोणी नाही. त्याला एकदा का राग आला की तो सगळ्या गोष्टीची नासाडी करु शकतो. हत्तीला त्याची उंची, वजन आणि भयंकर दातांमुळे अनेक प्राणी घाबरतात. पण जेव्हा तो जंगराची राणी सिंहिणीसमोर येतो, तेव्हा काय होत असेल? जरा विचार करा. यासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक हत्ती आणि सिंहिण समोरसा समोर येतात. तेव्हा त्यांच्यामध्ये काय होईल या विषयी उत्सुक्ता लागून रहाते आणि शेवटी असं काही घडतं ज्याची अपेक्षा देखील नसते. एक सिंह आणि 14 म्हशी, कोणाची होईल शिकार? Video पाहा आणि तुम्हीच ठरवा या व्हिडीओत हत्ती पाणी पिण्यासाठी विहिरी जवळ येतो. पण त्याला हे माहिती नसतं की तेथेच सिंहिण देखील बसली. आहे. सिंहिणीला हत्तीची चाहूल लागताच ती उठून बसते, तेवढ्यात हत्ती देखील सावध होतो आणि दबक्या पावलांनी पुढे जाऊन पाणी पिऊ लागतो. तो सिंहिणीला पाहात असतो आणि सिंहिण त्याला पाहात असते. पुढे काय होणार हे कोणालाच माहिती नसतं. तितक्यात काही वेळात हत्ती सोंडेने सिंहिणीवर पाणी उडवतो आणि मग काय… सिंहिण घाबरुन अशी काही धूम ठोकते की पुन्हा वळून मागे पाहातच नाही.
जंगलातील सर्वात मोठ्या शिकाऱ्याला असं घाबरताना पाहून अनेक नेटकऱ्यांना आश्चर्य वाटलं आहे, लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, तर नेटकऱ्यांनी या भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.