मुंबई, 09 डिसेंबर : लहान मुलं ज्यांना तसं फार काही समजत नसतं. जी आपल्याच जगात मस्त दंग असतात. कधी ती हट्ट करतात, कधी खोडकरपणा करतात, तर कधी खूप मस्ती करतात. पण ही मुलं कितीही हट्टी, खोडकर, मस्तीखोर असली तरी बऱ्याच वेळा ती मोठ्या माणसांनाही बरंच काही शिकवून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.एक कुत्रा तहानेने व्याकूळ झाला होता. त्याला पाहून एक चिमुकला त्याच्या मदतीसाठी धावून आला. या छोट्याशा कुत्र्यासाठी चिमुकले हात पुढे सरसावले. चिमुकल्याने तहानलेल्या कुत्र्यासाठी जे केलं ते पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तुम्हीही कितीही मोठे असाल तरी या चिमुरड्यासमोर आपण खूप लहान आहोत असंच तुम्हाला वाटेल. आपल्या छोट्या छोट्या हातांनी या लहान मुलाने मुक्या जीवाची तहान शमवण्याचा प्रयत्न केला. इवल्याशा हातांनी त्याने कुत्र्याच्या पिल्लाला पाणी पाजलं आहे.
कद कितना ही छोटा हो, हर कोई किसी की यथासंभव #Help कर सकता है.
— Dipanshu Kabra (@ipskabra) December 7, 2021
Well done kid. God Bless you.
VC- Social Media.#HelpChain #Kindness #BeingKind pic.twitter.com/yQu4k5jyh1
व्हिडीओत पाहू शकता एका कुत्र्याच्या पिल्ला तहान लागली आहे. पाणी पिण्यासाठी त्याने आपलं तोंड बोअरवेलला लावलं आहे. त्याचवेळी एका लहान मुलाने बोअरवेलचा हँडपम्प आपल्या चिमुकल्या हातात धरला आहे आणि तो बोअरवेलचं पाणी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. हे वाचा - आकाशात तडफडत होता पक्षी, वाचवण्यासाठी आला ‘देवदूत’; पाहा सुटकेचा थरारक VIDEO मुलगा इतका लहान आहे की त्याला बोअरवेलचा हँडपम्प हातातही धरता येत नाही आहे. बोअरवेलमधून पाणी काढण्यासाठी त्याला भरपूर जोर लावावा लागतो आहे. तरी आपल्यात असलेली आहे तितकी ताकद हा मुलगा लावतो. ज्यामुळे बोअरवेलमधून पाणी येतं आणि कुत्र्याचं पिल्लू ते पाणी पितं. आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. उंची कितीही लहान का असेना प्रत्येक जण शक्य तितकी मदत करू शकतो, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हे वाचा - कित्ती गोड! आईचा मेकओव्हर पाहून बाळाची गोड प्रतिक्रिया, पाहा CUTE VIDEO मुलाने ज्या पद्धतीने कुत्र्याला पाणी पाजण्यासाठी मेहनत घेतली आहे ते पाहून नेटिझन्स त्याचं भरपूर कौतुक करत आहेत. उंची लहान आहे पण हृदय मोठं आहे, या वर्षात मी पाहिली ही सर्वात चांगली गोष्ट आहे, अद्भुत अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.