मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - आकाशात तडफडत होता पक्षी, वाचवण्यासाठी Helicopter मधून आला 'देवदूत'; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद

VIDEO - आकाशात तडफडत होता पक्षी, वाचवण्यासाठी Helicopter मधून आला 'देवदूत'; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद

आकाशात पक्ष्याच्या सुटकेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

आकाशात पक्ष्याच्या सुटकेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

आकाशात पक्ष्याच्या सुटकेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

मुंबई, 09 डिसेंबर : आकाशात स्वच्छंद उडणाऱ्या पक्ष्यांना पाहताच या पक्ष्यांचं (Bird video) किती बरं ना त्यांना कसलीच चिंता नाही. निळ्या आकाशात, ढगांमधून मनसोक्त उडत असतात, असंच आपल्याला वाटतं. त्याच वेळी आपणही पक्षी (Bird rescue video) असतो, आपल्यालाही पंख असते, आपल्यालाही उडता आलं असतं तर किती बरं झालं असतं असा विचारही आपल्या मनात येतो. पण या पक्ष्यांचंही आयुष्यही आपल्याला जितकं वाटतं तितकं सोपं नाही. त्यांनाही बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो. अशाच एका संकटात अडकलेल्या पक्ष्यासाठी एक देवदूत धावून आला (Bird rescue by helicopter video). ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियार (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

उडताना पक्ष्यांना सर्वात जास्त धोका असतो तो लटकणाऱ्या विजेच्या तारांचा. अशाच तारांमध्ये एक पक्षी अडकला. जीव वाचवण्यासाठी तो धडफडत होता. तारेवर तो तडफडत होता. व्हिडीओ पाहूनच मन हादरतं. पण आकाशात इतक्या उंचावर या पक्ष्याला वाचवण्यासाठी कोण बरं जाईल. त्याचा जीव कसा वाचवणार? असा प्रश्नही आपल्याला पडतो. पण या पक्ष्याला वाचवण्यासाठी आकाशात देवदूतच आला.

तारेवर अडकलेल्या या पक्ष्याला वाचवण्यासाठी चक्क एक हेलिकॉप्टर आलं. एरवी पूर, भूकंप, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तीत माणसांना हेलिकॉप्टरने रेस्क्यू केल्याचं आपण पाहिलं आहे. पण अशा मुक्या जीवांना हेलिकॉप्टरने वाचवण्याची घटना दुर्मिळच म्हणावी लागेल.

हे वाचा - हे कसं शक्य आहे? एअरपोर्टवरील तो VIDEO पाहून नेटिझन्स हैराण

व्हिडीओत पाहू शकता एक हेलिकॉप्टर या पक्ष्याच्या जवळ येतं. हेलिकॉप्टरच्या बाहेर एक व्यक्ती बसलेला आहे. त्याला सुरक्षेसाठी दोरी बांधण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमार्फत ही व्यक्ती त्या पक्ष्याजवळ येते आणि त्याला तारेतून सुखरूपणे सोडवून एका बॅगेत ठेवते. त्यानंतर आपल्यासोबत त्या हेलिकॉप्टरमधून घेऊन जाते.

हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे हे माहिती नाही. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हे वाचा - गाडीचा चेंदामेंदा होऊनही वाचला महिलेचा जीव, Photo पाहून वाटेल आश्चर्य

व्हिडीओ पाहून पक्ष्यासाठी देवदूतासारख्या धावून आलेल्या या तरुणाचं कौतुक केलं जातं आहे. नेटिझन्स त्याला सॅल्युट करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Rescue operation, Viral, Viral videos