जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कित्ती गोड! आईचा मेकओव्हर पाहून बाळाची गोड प्रतिक्रिया, पाहा CUTE VIDEO

कित्ती गोड! आईचा मेकओव्हर पाहून बाळाची गोड प्रतिक्रिया, पाहा CUTE VIDEO

कित्ती गोड! आईचा मेकओव्हर पाहून बाळाची गोड प्रतिक्रिया, पाहा CUTE VIDEO

पार्लरमध्ये जाऊन मेकओव्हर केलेल्या आईकडे जेव्हा बाळानं पाहिलं, तेव्हा त्याची पहिली रिऍक्शन अवर्णनीय होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 9 डिसेंबर: आपल्या आईनं (Mother) केलेला मेकओव्हर (Makeover) पाहून तिच्या बाळानं अशी काही (Reaction of baby) प्रतिक्रिया दिली, की तिला प्रचंड आनंद झाला. बाळाचा जन्म झाल्यापासून ते मोठं होईपर्यंत त्याचं संगोपन (Care of baby) करताना बऱ्याचदा आईला स्वतःकडं लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. बाळाच्या संगोपनात ती इतकी व्यस्त होऊन जाते की स्वतःच्या लूकसाठी वेळ द्यायला, त्यासाठी पार्लरमध्ये जायला आईकडे वेळच नसतो. त्यात जर आई वर्किंग असेल, तर घर आणि ऑफिस या दोन्हीकडचं काम सांभाळता सांभाळता कधी दिवस निघून जातो, ते कळतही नाही. कुठल्याही बाळासाठी त्याच आई हीच जगातील सर्वात सुंदर स्त्री असते. तिच्याकडे पाहत पाहतच बाळ लहानाचं मोठं होत असतं. अशातच एखाद्या दिवशी जर आईनं आपला मेकओव्हर केला आणि पार्लरमध्ये जाऊन आली, तर तिचं सौंदर्य आणखीनच खुलतं. पार्लरमध्ये जाऊन आल्यानंतर जेव्हा बाळानं त्याच्या आईला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा त्यानं जी काही गोड रिऍक्शन दिली, त्याला इंटरनेटवर सध्या जोरदार पसंती मिळत आहे.

जाहिरात

बाळाच्या प्रतिक्रियेवर सगळे फिदा लंडनमध्ये राहणाऱ्या केट नावाच्या महिलेनं बऱ्याच दिवसांनी पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढला. जेव्हा ती पार्लरमध्ये जाऊन घरी परत आली, तेव्हा आपल्या बाळांची पहिली रिऍक्शन काय येते, ते पाहण्यासाठी तिने मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेऊनच घरात प्रवेश केला. आपल्या आईला आणखी सुंदर दिसताना पाहून बाळांना जो आनंद झाला, तो अवर्णनीय आहे. मोठ्या आणि छोट्या बाळाच्या प्रतिक्रियांवरून त्यांना नक्की काय वाटलं असावं आणि किती आनंद झाला असावा, ते कळतं. हे वाचा-  दही खाण्यासाठी पाकिस्तानी चालकाने मध्येच थांबवली ट्रेन; VIDEO पाहून व्हाल शॉक युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया या व्हिडिओत बाळाचे वडीलदेखील दिसत असून त्यांनी बाळाला कडेवर घेतलं आहे. तेदेखील केटच्या नव्या लूकचं कौतुक करताना दिसतात. वडील जसे महिलांशी वागतात, तशीच मुलं वागत असतात. मुलांच्या या गोड प्रतिक्रिया फारच आश्वासक वाटत असल्याच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत असून व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात