जाहिरात
मराठी बातम्या / Viral / साध्याभोळ्या गायीने उधळून लावला खतरनाक किंग कोब्राचा डाव; गोठ्यात येताच काय केलं पाहा VIRAL VIDEO

साध्याभोळ्या गायीने उधळून लावला खतरनाक किंग कोब्राचा डाव; गोठ्यात येताच काय केलं पाहा VIRAL VIDEO

गोठ्यात किंग कोब्रा (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

गोठ्यात किंग कोब्रा (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

गायीच्या गोठ्यातून किंग कोब्राच्या रेस्क्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Uttarakhand
  • Last Updated :

डेहराडून, 16 जून : किंग कोब्रा जगातील सर्वात खतरनाक सापांपैकी एक. असाच भयानक साप एका घरात घुसला. घरातील गोठ्यात जाऊन हा साप लपून बसला होता. पण गोठ्यातील गायीमुळे मोठा अनर्थ टळला. गायीने किंग कोब्रा पासून स्वतःसह आपल्या मालकाचाही जीव वाचवला आहे. हा थरारक असा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. उत्तराखंडमधील ही घटना असल्याचं सांगितलं जातं आहे. अल्मोडाच्या चौमू गावातील एका घरातील गोठ्यात किंग कोब्रा सापडला आहे. या सापाची लांबी 4-5 फूट नव्हे तर तब्बल 16 फूट आहे. गोठ्यात किंग कोब्रा असल्याची माहिती होताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं. त्यांनी सापाला धरून गोठ्यातून बाहेर काढलं. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोघांनी सापाच्या तोंडाला धरलं आहे. सापाला खेचत बाहेर आणलं जात आहे. पण सापाची ताकद इतकी की दोघंदोघं जण खेचूनही तो बाहेर येत नाही आहे. अखेर एक व्यक्ती तोंड सापाचं तोंड पकडून राहते आणि दुसरी आत जाऊन सापाच्या शेपटीला पकडून बाहेर आणते.  सापाची लांबी पाहूनच तुम्ही थक्क व्हाल. एखाद्या अजगरासारखा दिसणारा हा किंग कोब्रा. बापरे बाप! केसात लपून बसला साप, तरुणाने डोक्याला हात लावला अन्…; Shocking Video Viral अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गोठ्यातून हा साप काढण्यात आला होता. तिथेृं बांधलेल्या गाय, बकरी आणि इतर प्राण्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. अचानक प्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सर्वजण तिथं धावत गेले.  गोठ्यात इतका मोठा साप पाहून सर्वांना धक्काच बसला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापाला जंगलात सोडलं आहे. किंग कोब्रा सामान्यपणे उष्ण भागात आढळतात. थंड भागात ते राहत नाहीत. पण अल्मोडासारख्या थंड भागात साप आढळल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही आश्चर्य व्यक्त केलं आहे. 2020 सालीबी अल्मोडा गावातच कोब्रा रेस्क्यू करण्यात आला होता. त्यावेळी हवामानानुसार कोब्रा आपल्या राहणीमानात बदल करत असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. बुटांच्या मागे दडून बसला होता खतरनाक कोब्रा; लोकांना फुटला घाम, केलं ‘हे’ काम दुसरीकडे परिसरातील लोकांनी एवढा मोठा साप कधीच पाहिला नव्हता. तो पाहिल्यापासून संपूर्ण परिसरात घबराटीचं वातावरण आहे.

जाहिरात

@Singh99_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात