लंडन, 12 नोव्हेंबर : प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा वाढदिवस खास असतो. अनेक जण आपली जन्मतारीख, जन्मदिवस लकी मानतात. दर वर्षी वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी करण्याकडे बहुतांश जणांचा कल असतो. सध्याच्या काळात वाढदिवस म्हणजे पार्टी हे एकच समीकरण अनेकदा दिसून येतं; पण काही जण आपला वाढदिवस खास पद्धतीने साजरा करतात. सध्या ब्रिटनमधल्या एका मुलाचा वाढदिवस जोरदार चर्चेत आहे. अर्थात यामागे कारणही तितकंच खास आहे. या मुलाने 11 नोव्हेंबर 2022 रोजी आपला 11 वाढदिवस साजरा केला आहे. `11 हा अंक माझ्यासाठी खूप लकी आणि खास आहे,` असं हा मुलगा आवर्जून नमूद करतो. यामागे एक कारण आहे. ब्रिटनमधल्या हर्टफोर्डशायरमध्ये राहणाऱ्या डॅनियल सॉन्डर्सने 11 नोव्हेंबर रोजी त्याचा 11वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्याला 11 भेटवस्तू मिळाल्या. डॅनियल आणि त्याची 41 वर्षांची आई शार्लोट हे दोघंही 11 हा अंक खूप लकी मानतात. कारण डॅनियलचा जन्म 11 नोव्हेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी झाला. `माझ्या प्रसूतीची तारीख 17 नोव्हेंबर देण्यात आली होती; पण डॅनियलचा जन्म सहा दिवस अगोदर झाला. 11 नोव्हेंबरला मला लेबर पेन्स जाणवू लागल्या आणि डॅनियलचा जन्म झाला. डॅनियलच्या जन्मापासून 11 हा अंक त्याच्या प्रत्येक गोष्टीशी जोडला गेला आहे,` असं शार्लोट सॉन्डर्स यांनी सांगितलं. हे वाचा - Wedding Cake वरून लग्नात राडा! नवरदेवाने उचललं धक्कादायक पाऊल, नवरी हादरली `डेली मेल`ने दिलेल्या वृत्तानुसार, डॅनियलची आई शार्लोट सॉन्डर्स तिच्या शालेय जीवनापासून 11 या अंकाला शुभ मानत आली आहे. जेव्हा डॅनियलचा जन्म 11 तारखेला झाला तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने तिच्या मुलाच्या 11व्या वाढदिवसानिमित्त त्याला 11 भेटवस्तू दिल्या. डॅनियलचा जन्म 11 नोव्हेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी झाला. `मी माझ्या वाढदिवसाची आतुरतेनं वाट पाहात असतो. हा दिवस माझ्यासाठी इतर कोणत्याही दिवसांच्या तुलनेत अधिक रोमांचक असतो. हा माझा लकी नंबर आहे आणि लक्षात ठेवायलादेखील सोपा आहे. मी माझा वाढदिवस कधीच विसरू शकत नाही,` असं डॅनियलने सांगितलं. डॅनियलसह त्याचे कुटुंबीयदेखील 11 हा अंक लकी चार्म मानतात. विशेषतः त्याची आई शार्लोटला 11 हा अंक विशेष आवडतो. हे वाचा - आश्चर्य! हाडामांसाऐवजी चक्क ‘प्लॅस्टिकचं बाळ’; महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही शॉक वाढदिवसाची तारीख वैशिष्ट्यपूर्ण असल्याने डॅनियल नेहमीच चर्चेत असतो. अनेकांना या योगायोगाचं आश्चर्यदेखील वाटतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.