जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Wedding Cake वरून लग्नात राडा! नवरदेवाने उचललं धक्कादायक पाऊल, नवरी हादरली

Wedding Cake वरून लग्नात राडा! नवरदेवाने उचललं धक्कादायक पाऊल, नवरी हादरली

लग्नात केक कापताना भयंकर प्रकार.

लग्नात केक कापताना भयंकर प्रकार.

वेडिंग केकवरून लग्नात नको ते घडलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

लंडन, 11 नोव्हेंबर :  लग्न म्हटलं की मजामस्ती आलीच. अशा मजेशीर क्षणांसह काही भावुक क्षणही असतात. लग्नाचे असे बरेच इमोशनल, फनी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या लग्नाचा असा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहूनच तुम्हाला धक्का बसेल. लग्नातच जबरदस्त राडा झाला आहे. याचं कारण म्हणजे वेडिंग केक. वेडिंग केकवरून लग्नात नको ते घडलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. बऱ्याच लग्नात तुम्ही पाहिलं असेल नवरा-नवरी लग्नानंतर वेडिंग केक कापतात आणि आपल्या लग्नाचा आनंद साजरा करतात. अशाच एका लग्नात नवरा-नवरी वेडिंग केक कट करत होते. पण तेव्हा असं काही घडलं की नवरा-नवरीसह सर्वजण घाबरले. यानंतर नवरदेव इतका संतप्त झाला की त्याने रागात धक्कादायक पाऊल उचललं. लग्नात जे काही घडलं त्यामुळे नवरीसुद्धा हादरली. हे वाचा -  VIDEO - नवरीसमोर अति उत्साह, जोश पडला महागात; लग्नाच्या दिवशीच नवरदेव रुग्णालयात व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांसोबत उभे आहेत. त्यांच्या आजूबाजूला नातेवाईक, पाहुणे, मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्या समोर टेबलवर एक मोठा केक ठेवण्यात आला आहे. दोघं केक कटिंगच्या तयारीत आहेत.  दोघंही केक कापणार तोच एक व्यक्ती तिथं येते आणि भलतंच करून बसते. नवरा-नवरी केक कापतात न कापतात तो ती व्यक्ती केकची अक्षरशः वाट लावते. केकचा एक मोठा तुकडा हातात घेऊन ती आधी नवरदेवाला आणि नंतर नवरीच्या चेहऱ्याला लावते. सर्वकाही इतक्या पटापट होतं की कुणालाच काही कळत नाही. नवरदेव तिथंच स्तब्ध उभा राहतो. तर नवरीबाई घाबरून त्या व्यक्तीपासून दूर पळते. हे वाचा -  बापरे! धगधगत्या आगीत नवरा-नवरीचा ‘रोमान्स’; Wedding Video पाहून सर्वांना फुटला घाम नवरदेवाचा चेहरा पाहिला तर तो रागाने लालभडक झाला आहे. बराच वेळ तो केकची वाट लावणाऱ्या त्या व्यक्तीकडे एकटक पाहतो आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक जोरात मुक्का मारतो. व्यक्ती धाडकन जमिनीवर कोसळते तिच्या नाकावर हा मुक्का बसतो. तरी ती व्यक्ती स्वतःच पुन्हा उठून उभी राहते आणि संतप्त नवरदेवाला मिठी मारण्याचा प्रयत्न करते.

जाहिरात

@spurked ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. नेटिझन्सही या व्यक्तीच्या या कृत्यावर संतप्त झाले आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला  आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात