मुंबई, 20 डिसेंबर : मांजरांचे बरेच व्हिडीओ (Cat video) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या अशा एका मांजरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो तुम्ही कधीच पाहिला नसेल. मांजरातील आत्मविश्वास दाखवणारा असा हा व्हिडीओ आहे. अगदी माणसानेही प्रेरणा घ्यावी असं काम या मांजराने केलं आहे (Cat jump video) . मांजराचा हैराण करणारा व्हिडीओ आईएएस अधिकारी डॉ. एम. वी. राव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक मांजर दिसते आहे. ही मांजर नदीकिनाऱ्यावर उभी आहे. तिला नदीच्या पलिकडे जायचं आहे. पण नदी खूप मोठी आहे. तिला पार करणं कठीण आहे. पण तरी मांजर हार मानत नाही. ती नदी पार करण्याचं ठरवते.
Leap of Faith 🥰
— M V Rao @ Public Service (@mvraoforindia) December 19, 2021
📽️ Social Media pic.twitter.com/EmawTQoqDV
मांजर अशी उडी मारते की एकाच उडीत ती नदीच्या अलिकडून पलिकडे जाते. ती इतकी मोठी उडी मारते की ती सहजपणे नदी पार करते. तिच्या उडीसोबतच तिची इच्छा आणि विश्वासही तितकाच महत्त्वाचा आहे. तो नसता तर कदाचित ही मांजर नदी पार करूच शकली नसती. हे वाचा - OMG! घोडाही असं करू शकतो? आईसमोरच पिल्लाला जिवंत गिळलं; Shocking Video Viral अवघ्या 45 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. मांजराचा हा व्हिडीओ पाहून डॉ. रावसुद्धा थक्क झाले आहेत. ‘विश्वासाची उडी’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सही थक्क झाले आहे. आत्मविश्वासाचं उत्तम असं उदाहरण म्हणून या व्हिडीओकडे पाहिलं जातं आहे.

)







