मॉस्को, 20 डिसेंबर: एक कुत्रा चित्त्याच्या वेगाने धावत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियात वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे कुत्रा आणि मांजर यांचंच असतं. सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून भल्याभल्यांना कुत्र्याच्या वेगाचं आश्चर्य वाटत आहे. एखादा कुत्रा बर्फातून वाऱ्याच्या वेगाने कसा काय धावू शकतो, असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकालाच पडत आहे.
View this post on Instagram
बर्फात मालकासोबत खेळतो खेळ
व्हिडिओत दिलेल्या डिस्क्रीप्शनवरून हे ठिकाण रशियातील असल्याचं दिसलं. रशियासह अनेक बर्फाळ प्रदेशात एक खेळ खेळला जातो. या खेळात रबराच्या रिंगवर माणसं बसतात आणि बर्फातून खाली घसरत जातात. रशियात एक मालक आणि त्याचा कुत्रा हा खेळ खेळताना दिसतात.
कुत्र्याने घेतला वेग
बर्फाच्या टोकावर रबराच्या ट्यूबवर बसलेल्या मालकाला त्याचा कुत्रा तोंडाने खेचताना दिसतो. हळूहळू त्याची रिंग बर्फाच्या उतारापाशी येते आणि मालक घसरू लागतो. ते पाहून त्याचा कुत्रा मालकाच्या पुढे धावू लागतो. साधारणतः कुठलाच कुत्रा एवढ्या वेगाने धावताना दिसत नाही. मात्र हा कुत्रा थक्क करणाऱ्या वेगाने धावत मालकाच्याही पुढे राहतो आणि जेव्हा उतार संपून ट्यूबचा वेग कमी होतो, तेव्हा पुन्हा तो मालकापाशी येऊन खेळायला सुरुवात करतो.
हा कुत्रा की चित्ता?
हा कुत्रा आहे की चित्ता आहे, असा सवाल प्रेक्षकांनी विचारला आहे. चित्ता ज्याप्रमाणे आपली शिकार करण्यासाठी धावतो, त्याप्रमाणे हा कुत्रा धावताना दिसतो. चित्ता सहसा शिकार सोडत नाही. विद्युतवेगाने धावत तो आपल्या शिकारीला पकडतो आणि यशस्वी होऊनच परत येतो. तसाच वेग या व्हिडिओत कुत्र्यानं घेतल्याचं दिसतं.
हे वाचा- UPI पेमेंट करताना सावध रहा, छोटीशी चूक बँक अकाऊंट रिकामं करेल
व्हिडिओ होतोय व्हायरल
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून आतापर्यंत त्याला 60 हजारपेक्षा जास्त व्हयूज मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Iceland, Video viral